नरेंद्र मोदींसोबत टीव्हीवर डिबेट करायचीय, इमरान खान यांचा नेमका प्लॅन काय?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारणे आणि मतभेदांवर मार्ग काढण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासमोर टीव्हीवरील चर्चा घेण्यात यावी, असं म्हटलंय.

नरेंद्र मोदींसोबत टीव्हीवर डिबेट करायचीय, इमरान खान यांचा नेमका प्लॅन काय?
इमरान खान आणि नरेंद्र मोदीImage Credit source: PTI News
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 9:57 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इमरान खान (Imarn Khan) यांनी मंगळवारी भारतासमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. त्या प्रस्तावामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारणे आणि मतभेदांवर मार्ग काढण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासमोर टीव्हीवरील चर्चा घेण्यात यावी, असं म्हटलंय. इमरान खान यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतल्यानंतर मॉस्कोमध्ये रशिया टुडे या माध्यमाशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. मी नरेंद्र मोदी यांच्याशी टीव्हीवर चर्चा करण्यास पसंती देईन, असं ते म्हणाले आहेत. पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानानंवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. भारतानं त्यावेळी सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं होतं. तर, दहशतवाद आणि चर्चा एकावेळी होऊ शकत नाही, हे भारतानं यापूर्वीचं स्पष्ट केलंय.

पाकिस्तानला व्यापार वाढवायचाय

इमरान खान यांनी भारत हा शत्रुत्व असलेला देश बनला आहे. त्यामुळं भारतासोबतचा व्यापार कमी झालेला आहे. भारत सरकारचं धोरण सर्व देशांशी व्यापार करण्याचं आहे. आशियात पाकिस्तानसमोर व्यापारासाठी मर्यादित पर्याय आहेत, असंही इमरान खान यांनी म्हटलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं अद्याप या प्रस्तावावर भाष्य केलेलं नाही. इमरान खान यांचे वरिष्ठ सल्लागार अब्दुल रजाक दाऊद यांनी भारताशी व्यापार ही काळाची गरज आहे. दोन्ही देशांशी ही गोष्ट फायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. फायनान्शियल अ‌ॅक्शन टास्क फोर्सच्या बैठकीनंतर इमरान खान यांनी हे वक्तव्य केलं आहे. पाकिस्तान एफटीएफ टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंगवर प्रतिबंध ठेवण्याबाबत पाकिस्तान करत असलेल्या प्रयत्नांची समीक्षा केली जाईल, असं खान यांनी मह्टलं.

दहशतवाद आणि चर्चा एका वेळी होऊ शकत नाही

भारतानं गेल्या दोन दिवसांमध्ये पाकिस्तानला दहशतवादी कारवाया आणि चर्चा एकावेळी होऊई शखत नाहीत, असं म्हटलंय. सीमांवरील दहशतवादी कारवाया पाकिस्ताननं थांबवाव्यात असं भारतानं सांगितलं आहे. 2008 मधील दहशतवादी कारवाया,2016 मधील पठाणकोट दहशतवादी कारवायांना जबाबदार असलेल्या संघटनांवर कारवाई करावी, असं देखील सांगितलं आहे. उरी येथील दहशतवादी हल्ला आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळं भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे.

इतर बातम्या :

Mumbai Local : लोकलवरील निर्बंध हटणार नाहीत, लस न घेणाऱ्यांना प्रवासाची मुभा नाहीच, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आदेश

आझाद मैदानावर उद्यापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची धरणे आंदोलन; किसान मोर्चाचा जाहीर पाठिंबा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.