Parambir Singh : ‘मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन केलेली बेकायदेशीर बदली रद्द करा’, परमबीर सिंगांची मागणी

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल.

Parambir Singh : 'मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन केलेली बेकायदेशीर बदली रद्द करा', परमबीर सिंगांची मागणी
परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 8:45 PM

नवी दिल्ली : सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी एक ‘लेटर बॉम्ब’ टाकला आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक होत गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान सिंग यांनी पदावर असताना पत्र का लिहिलं नाही? असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून विचारला जात आहे. त्यावर परमबीर सिंग यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.(Parambir Singh has filed a petition in the Supreme Court seeking cancellation of the illegal transfer of the post of Mumbai CP)

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल. ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतही परमबीर सिंग यांची बाजू मांडणार आहेत.

याचिकेत परमबीर सिंग यांच्या 3 प्रमुख मागण्या

परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताना तीन महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यात देशमुखांनी पहिली मागणी अनिल देशमुख यांच्या गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन केलेली बदली बेकायदेशीर असल्यानं रद्द करावी, म्हणजेच पुन्हा मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्तीची मागणी केली आहे. तर तिसरी मागणी ही पुढील कारवायांपासून संरक्षण देण्याची आहे.

परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेत नेमकं काय?

परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय, “गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी केलेल्या तक्रारीची निप:क्ष, प्रभावहीन आणि कोणाचीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सतत्या तपासणे आवश्यक आहे.

अनिल देशमुखांनी फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांच्या निवासस्थानी ACP सचिन वाझे आणि ACP संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. या दोघांच्या वरिष्ठांना डावलून ही बैठक झाली होती. त्या बैठकीत महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेत अनिल देशमुखांनी दिलं होतं.

त्यापूर्वी 24 की 25 ऑगस्ट 2020 मध्ये , रश्मी शुक्ला, ज्या राज्य गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त होत्या, त्यांनीही पोलीस महासंचालकांना, पोस्टिंग किंवा बदलीमध्ये अनिल देशमुखांकडून भ्रष्टाचार होत असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी याप्रकरणात अनिल देशमुखांवर कोणतीही कारवाई न करता उलट रश्मी शुक्लांनाच सुनावण्यात आलं होतं.

मग गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक तपासामध्ये हस्तक्षेप करुन पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या तशा सूचना देत होते, असा उल्लेख परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

अनिल देशमुखांचीही तयारी

गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी सध्या अनिल देशमुखांकडून कायदेशीर बाबींचा अंदाज घेतला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि गृहखात्याच्या अतिरिक्त सचिवांशी नुकतीच चर्चा केली. त्यांच्या सल्ल्याने आता अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

Sachin Vaze Case : एटीएसने जप्त केलेली व्हॉल्वो फडणवीसांच्या गुडबुक्समधल्या बिल्डरची!, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

विरोधकांकडून आरोपांची मालिका कशासाठी?; रोहित पवारांचं सूचक ट्विट

Parambir Singh has filed a petition in the Supreme Court seeking cancellation of the illegal transfer of the post of Mumbai CP

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.