Congress : निमलष्करी दलाच्या ट्रकमध्ये भरुन पैसे भाजपा कार्यालयात पोहचवले, काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप, महाराष्ट्रात आणि कर्नाटकात कांदे-बटाट्यांनी सरकारे बदलली नाहीत
यावेळी भाजपावर टीका कराताना अशोक गेहलोत म्हणाले की- गोवा, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांतील सरकारे ही कांदा बटाट्यांनी पडलेली नाहीत. नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. ज्या 500-1000 च्या नोटा जास्त जागा घेत होत्या, त्यात यांनी बंद केल्या, हा कॉमन सेन्सचा भाग आहे.
जयपूर – भाजपा आणि निमलष्करी दलांवर (Paramilitary forces)काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot)यांनी गंभीर आरोप केले आहेत. पैशांच्या जोरावर अनेक राज्यांतील सरकारे पाडण्याच्या भाजपाच्या कृतीवर गेहलोत यांनी जोरदार आगपाखड केली आहे. निमलष्करी दल आणि पोलिसांच्या ट्रकमध्ये भरभरुन दोन नंबरचा पैसा भाजपा (BJP offices)कार्यालयात पोहचवला जातो, असा गंभीर आरोप गेहलोत यांनी केला आहे. अशोक गेहलोत म्हणालेत की- हे काय करतात तुम्हाला माहित आहे का? ज्या राज्यात भाजपाची सरकारे आहेत, हे तिथे निमलष्करी दल किंवा पोलिसांना पकडतात. त्या निमलष्करी दलांच्या ट्रकमधून पैसा आणला जातो. हा ट्रक भाजपाच्या कार्यालयाच्या मागे नेला जातो. गाडी पोलीस किंवा निमलष्करी दलाची असेल तर त्या गाडीला पकडणार कोण, लोकांना वाटते त्यांचे पोलीसदल आले आहे, त्यांना मदत करण्यासाठी. हे देशासूोत सुरु असलेले मोठे षडयंत्र असल्याचा आरोपही गेहलोत यांनी केला आहे. या सगळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. सत्याची सोबत आपल्याला आहे. जयपूरमध्ये पार पडलेल्या काँग्रेस स्वाधिनता दिनाच्या कार्यक्रमात अशोक गेहलोत यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटकातील सरकारे कांदा-बटाट्यांनी पडलेली नाहीत
यावेळी भाजपावर टीका कराताना अशोक गेहलोत म्हणाले की- गोवा, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांतील सरकारे ही कांदा बटाट्यांनी पडलेली नाहीत. नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. ज्या 500-1000 च्या नोटा जास्त जागा घेत होत्या, त्यात यांनी बंद केल्या, हा कॉमन सेन्सचा भाग आहे. यांनी 1000 रुपयांची नोट बंद करुन 2000 रुपयांच्या नोटा का सुरु केल्या. रुपयांची जी वाहतूक करण्यात येते, त्यात 2000 रुपयांच्या नोटा कमी जागा घेतात, त्यामुळेच हे करण्यात आले, असा दुसरा गंभीर आरोप गेहलोत यांनी केला आहे.
गुजरात मॉडेल फ्लॉप होते, संपूर्ण देशाला धोका दिला
नरेंद्र मोदी यांनी उदो उदो केलेले गुजरात मॉडेल फ्लॉप होते, अशी टीकाही गेहलोत यांनी केली आहे. गुजरात मॉडेलच्या नावाने संपूर्म देशाला धोका देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. याची सुरुवात अडवाणींनी केली आणि त्याचा आधार घेत नरेंद्र मोदी दिल्लीपर्यंत पोहचले. गेहलोत म्हणाले की- गुजरात मॉडेल असे काही नव्हतेच. जे होते ते केवळ मार्केटिंग होते. भाजपावाले आजही मार्केटिंगलर हजारो कोटी रुपये खर्च करीत आहेत. सध्याचा जमाना हा आयटी आणि सोशल मीडियाचा आहे. त्यावर भाजपा खूप मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करीत आहेत.
भविष्यात राजकारण करणार नाही, रा. स्व. संघाने लिहून दिले होते
तर स्वातंत्र्यदिनाच्या एका कार्यक्रमात अशोक गेहलोत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीकास्त्र सोडलेले आहे. गेहलोत म्हणाले की – मला लहानपणाची देविस आठवतात, त्यावेळी हिंदी आणि इंग्रजीवरुन आंदोलने होत असत. आम्ही इंग्रजीच्या विरोधात होतो. तर तामिळनाडूतील जनता ही हिंदीच्या विरोधात होती. त्यावेळी दंगली जात्या होत्या, हे आता ही मंडळी विसरलेली आहेत. यांना विचारा की हे हिंदू राष्ट्राबाबत बोलतात. हिंदू राष्ट्र होईल पण समाजातील दलित वंचितांचे काय, भेदभाव मिटवण्यासाठी, स्पृश्य-अस्पृश्यता वाद मिटवण्याची चर्चा हे का करीत नाहीत, 100 वर्षांची तुमची सांस्कृतिक संघटना आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. ज्या संघटनेवर सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदी घातली होती. त्यावेळी यांनी लिहून दिले होते की भविष्यात राजकारण करणार नाही. आज ही मंडळी काय करीत आहेत. ही संघटना भाजपाला सोबत घेऊन देशात काय करीत आहे, असा सवाल गेहलोत यांनी उपस्थित केला आहे.