नवी दिल्ली: वार्षिक परीक्षांना समोरे जाणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी आज टेन्शनमुक्त होऊन परीक्षा देण्याचा कानमंत्र दिला. तुम्ही एकाचवेळी एवढे प्रश्न विचारले. मला वाटतं मलाच पॅनिकमधून जावं लागतंय. तुमच्या मनात भीती निर्माण का होते? हा सवाल माझ्या मनात आहे. तुम्ही पहिल्यांदाच परीक्षा देत आहात का? तुम्ही अनेकवेळा परीक्षी दिली आहे. तुम्ही मनात ठरवा की परीक्षा (examination) ही जीवनाचा एक सहज भाग आहे. विकास यात्रेचा एक टप्पा आहे. त्यातून जायचं आहे आणि आपण गेलो आहोत. आपण एवढ्या परीक्षा दिल्या आहेत की एक्झाम प्रूफ झालो आहोत. त्यामुळे आपण एक्झाम प्रुफ झालो असं समजूनच परीक्षा द्या. परीक्षेची भिती अजिबात बाळगू नका. परीक्षा या जीवनाचा एक छोटा भाग आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. परीक्षा पे चर्चा (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमात मोदींनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना छोटी छोटी उदाहरणं देऊन त्यांच्या मनातील भीती दूर करण्यावर मोदींनी भर दिला.
परीक्षेचे हे अनुभव हीच आपली शक्ती असते. तो अनुभव लहान मानू नका. तुमच्या मनात जे पॅनिक होतं. त्यातून तुम्ही तयारी करण्यास कमी पडलाय का? असा प्रश्न निर्माण होतो. माझा सल्ला आहे. हे ओझं घेऊन जायचं आहे. जे केलं आहे त्याला विश्वासाने पुढे न्यायचं आहे. एखाद्या गोष्टीत मेहनत कमी पडली असेल तर त्यात एवढं काय घाबरून जायचं? इतर गोष्टीत माझा आत्मविश्वास असेल तर बाकीच्या गोष्टी पूर्ण होतात. तुम्ही टेन्शन घेऊ नका. पॅनिक क्रिएट होईल असं वातावरण करू नका. सहज दिनक्रम असू द्या, असं मोदी म्हणाले.
एक व्यक्ती असं करतो म्हणून आपणही असंच करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मित्राला चांगले मार्क मिळतात त्यामुळे तुम्ही ही त्याच्या सारखं करायला जाता. तुमचे मित्रं जे करतात ते करू नका. तुम्ही सहजतेने परीक्षाल सामोरे जा. तुमची ताकद तुम्ही ओळखा. तुमच्या पद्धतीने परीक्षेचं नियोजन करा. अनुकरण करू नका, असं ते म्हणाले.
तुम्हाला टेन्शन नाही ना? असेल तर तुमच्या कुटुंबाला असेल. टेन्शन कुणाला आहे? तुम्हाला की तुमच्या आईवडिलांना? ज्यांना टेन्शन आहे त्यांनी हात वर करा. तुम्हाला टेन्शन असेल तर हात वर करा. आईवडिलांना टेन्शन असेल तर अशा विद्यार्थ्यांनी हातवर करा, असे सवाल करत मोदींनी संवादाला सुरुवात केली. सण उत्सवाच्या काळात परीक्षा आल्या आहेत. त्यामुळे सणाची मजा घेता येत नाही. पण परीक्षेला उत्सव केलं तर त्यात अनेक रंग भरले जातात. ते रंग भरण्याचं काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
मला अनेकांनी मेसेज पाठवले. विद्यार्थ्यांनी पाठवले आहेत. मीडियाच्या लोकांनीही पाठवले आहेत. यावेळी मी नवं धाडस करणार आहे. पाच वर्षाचा अनुभव आहे. काही लोकाना वाटतं माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं नाही. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली. किंवा तुमचे प्रश्न राहिले तर व्हिडिओ किंवा ऑडिओ द्वारे तुम्हाला त्याची उत्तरे सांगेल. किंवा नमो अॅपवरून तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल, असंही ते म्हणाले.
#ParikshaPeCharcha with my young friends. https://t.co/VYwDO6PLLz
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2022
संबंधित बातम्या: