Budget 2022 Date : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर, 1 फेब्रुवारीला बजेट सादर होणार
संसदेचं बजेट सत्र 31 जानेवारीपासून सुरु होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. संसंदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रात पार पडणार आहे. 31 जानेवारीपासून अधिवेशनाला सुरुवात होईल. 11 फेब्रुवारीला अधिवेशनाचा पहिला टप्पा पार पडेल.
नवी दिल्ली : संसदेचं बजेट सत्र (Parliament Budget Session) 31 जानेवारीपासून सुरु होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. संसंदेचं अर्थसंकल्पीय (Budget Session Date) अधिवेशन दोन सत्रात पार पडणार आहे. 31 जानेवारीपासून अधिवेशनाला सुरुवात होईल. 11 फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अधिवेशनाचा पहिला टप्पा पार पडेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशन 12 मार्चला सुरु होणार आहे. तर, 8 एप्रिला अधिवेशनाची समाप्ती होईल. या दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) या 1 फेब्रुवारीला बजेट सादर करतील, अशी माहिती आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ससंदेतील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले होते. संसदेतील जवळपास 400 कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेची पाहणी केली होती. नरेंद्र मोदी सरकार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणार का हे पाहावं लागणार आहे.
CCPA recommends part one of Parliament’s Budget Session from Jan 31 to Feb 11; part two from March 14 to April 8: Sources
— Press Trust of India (@PTI_News) January 14, 2022
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31जानेवारीपासून पार पडणार आहे. देशात सध्या 2 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत, अशा स्थितीत संसदेचं बजेट अधिवेशन जाहीर करण्यात आलं आहे. संसदेतील 400 कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याचं समोर आलं होतं. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संसदेतील कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले होते.
लोकसेभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून पाहणी
मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पार्लमेंट हाऊसची पाहणी केली होती. संसद सदस्य आणि आरोग्य विषयक खबरदारीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा त्यांनी आढावा घेताल होता. ओम बिर्ला यांनी त्यावेळी 60 वर्षांपेक्षा जादा वय असणाऱ्या खासदारांची विशेष दक्षता घेण्यात यावी. त्या दृष्टीनं कोविड प्रतिबंधक यंत्रणेचा आढावा देखील त्यांनी घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.
संसदेच्या इमारतीमध्ये कोरोना चाचणी आणि कोरोना लसीकरणाची यंत्रणा उभारण्यात आली आहे. संसदेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित आढळून आले होते, हे वास्तव आहे. मात्र, सध्या सर्व अधिकारी कर्मचारी व्यवस्थित असून त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यात येत असून डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत, असं ओम बिर्ला म्हणाले आहेत.
इतर बातम्या:
प्रतीक्षा संपली ! सेव्हन सिटर Kia Carens कार भारतात लॉन्च, फक्त 25 हजार रुपये देऊन करा बूक
प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
Parliament Budget Session from 31st Jan to 11 Feb 2nd part of session from 14 March till 8th April Union Budget on 1st February