Parliament Monsoon Session: पेगाससवरून संसदेत तांडव, लोकसभा अध्यक्षांवर कागद फेकले; 10 खासदार निलंबित होणार?

पेगासस प्रकरणावरून संसदेत आज प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात हे प्रकरण लावून धरले आहे. काही गोंधळी सदस्यांनी थेट लोकसभा अध्यक्षांवर आणि मीडिया गॅलरीच्या दिशेने कागद फेकले. (Parliament Monsoon Session)

Parliament Monsoon Session: पेगाससवरून संसदेत तांडव, लोकसभा अध्यक्षांवर कागद फेकले; 10 खासदार निलंबित होणार?
भारतीय संसद
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 3:45 PM

नवी दिल्ली: पेगासस प्रकरणावरून संसदेत आज प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात हे प्रकरण लावून धरले आहे. काही गोंधळी सदस्यांनी थेट लोकसभा अध्यक्षांवर आणि मीडिया गॅलरीच्या दिशेने कागद फेकले. संसदेत जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. वारंवार संसदेचं कामकाज तहकूब करावं लागत असल्याने 10 गोंधळी खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारकडून आणण्याची शक्यता आहे. (Parliament Monsoon Session: proceedings of the house being adjourned continuously amid the uproar)

आज सकाळपासूनच विरोधकांनी राज्यसभा आणि लोकसभेत पेगासस प्रकरणावरून गोंधळ घातला. पेगासस प्रकरणावर चर्चा घडवून आणण्याची विरोधकांची मागणी आहे. तर सरकारने ही चर्चा फेटाळून लावली आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातल्याने दोनदा दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत तर विरोधकांनी वेलमध्ये उतरून थेट लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने कागद फेकले. काही सदस्यांनी मीडिया गॅलरीच्या दिशेने कागदं उधळून जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाल्याने कामकाज 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. तर राज्यसभेचं कामकाज उद्या गुरुवार 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

कामकाजात व्यत्यय

दरम्यान, सभागृहात खासदारांकडून रोज गोंधळ घातला जात आहे. त्यामुळे संसदेच्या कामकाजात व्यत्यय येत आहे. आज सकाळी तर काही सदस्यांनी थेट अध्यक्षांवरच कागदांची उधळण केली. त्यामुळे या सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. सुमारे 10 खासदारांना निलंबित केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तडजोड नाहीच

दरम्यान, आज विरोधकांची पार्लमेंट चेंबरमध्ये एक बैठक पार पडली होती. यावेळी पेगाससच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचा निर्धार विरोधकांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत झालेल्या या बैठकीला काँग्रेस, डीएमके, राष्ट्रवादी, शिवसेना, राजद, सपा, सीपीआयएम, सीपीआय, नॅशनल कॉन्फरन्स, आम आदमी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, आरएसपी, केरळा काँग्रेस (एम) आणि व्हिसीके पार्टीचे नेते उपस्थित होते. या बैठकीला शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सरकारला यावर उत्तर द्यावच लागेल, असा इशारा दिला. (Parliament Monsoon Session: proceedings of the house being adjourned continuously amid the uproar)

संबंधित बातम्या:

मोदी-शहांकडून देशाच्या लोकशाहीवर घाव, पेगासस प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह 14 पक्ष एकवटले; पेगाससप्रकरणावरून आता माघार नाही, राहुल गांधींचा इशारा

OBC reservation: लढ्याला प्रचंड यश! मेडिकल प्रवेशात ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याचे मोदींचे आदेश; महाराष्ट्राला किती लाभ?

(Parliament Monsoon Session: proceedings of the house being adjourned continuously amid the uproar)

'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....