चीनच्या 59 अॅप्सवर बंदी, Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा म्हणतात…
भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घातली आहे. या निर्णयाचं पेटीएम या डिजिटल पेमेंट कंपनीकडू स्वागत करण्यात आलं आहे. (Paytm founder vijay shekhar sharma on chinese apps ban).
मुंबई : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घातली आहे (Paytm founder vijay shekhar sharma on chinese apps ban). यामध्ये टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारख्या अनेक अॅप्लिकेशनचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं पेटीएम या डिजिटल पेमेंट कंपनीकडू स्वागत करण्यात आलं आहे.
पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी ट्विट करत “ही भारतातील डिजिटल क्रांती आहे”, असं म्हटलं आहे.”राष्ट्रहितासाठी हा खूप मोठा निर्णय आहे. या निर्णयामुळे देशातील आत्मनिर्भर अॅप्सला चांगला प्रतिसाद मिळेल. भारताच्या युवा पिढीसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. त्यांनी चांगले अॅप तयार करावे”, असं आवाहन विजय शेखर शर्मा यांनी केलं (Paytm founder vijay shekhar sharma on chinese apps ban).
Bold step in the national interest. A step towards Atmanirbhar App ecosystem. Time for the best Indian entrepreneurs to come forward and build the best by Indians, for Indians! ये है भारत की डिजिटल क्रांति ! ??#आत्मनिर्भरभारत
— Vijay Shekhar Sharma (@vijayshekhar) June 29, 2020
भारतीय सार्वभौमत्व, संरक्षण, एकात्मतेबद्दल पूर्वग्रह दूषित असल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने याबाबतचे कठोर पाऊल उचलले आहे. डेटा आणि गोपनीयता समस्यांमुळे भारत सरकारने हे पाऊल उचललं असल्याचे बोललं जात आहे.
भारताकडून चीनच्या ‘या’ अॅपवर बंदी
- TikTok
- Shareit
- Kwai
- UC Browser
- Baidu map
- Shein
- Clash of Kings
- DU battery saver
- Helo
- Likee
- YouCam makeup
- Mi Community
- CM Browers
- Virus Cleaner
- APUS Browser
- ROMWE
- Club Factory
- Newsdog
- Beutry Plus
- UC News
- QQ Mail
- Xender
- QQ Music
- QQ Newsfeed
- Bigo Live
- SelfieCity
- Mail Master
- Parallel Space
- Mi Video Call Xiaomi
- WeSync
- ES File Explorer
- Viva Video QU Video Inc
- Meitu
- Vigo Video
- New Video Status
- DU Recorder
- Vault- Hide
- Cache Cleaner DU App studio
- DU Cleaner
- DU Browser
- Hago Play With New Friends
- Cam Scanner
- Clean Master Cheetah Mobile
- Wonder Camera
- Photo Wonder
- QQ Player
- We Meet
- Sweet Selfie
- Baidu Translate
- Vmate
- QQ International
- QQ Security Center
- QQ Launcher
- U Video
- V fly Status Video
- Mobile Legends
- DU Privacy
सोशल मीडियावर पेटीएमवरही बंदी घालण्याची मागणी
दरम्यान, भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी कंपन्यांचे अॅप भारतात बंद करा, अशी मागणी हजारो नागरिकांनी सोशल मीडियावर केली होती. सोशल मीडियावर काही लोकांनी पेटीएमवरही बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. कारण पेटीएम हे अॅप भारतीय जरी असले तरी या अॅपमध्ये अलिबाबा या चिनी कंपनीची मोठी गुंतवणूक आहे. अलिबाबा ही कंपनी यूसी ब्राऊझर अॅपचे संस्थापक जैक मा यांची आहे. दरम्यान, यूसी ब्राऊझर या अॅपवरदेखील सरकारने बंदी घातली आहे.