Pegasus : पेगासस हेरगिरी प्रकरण : समितीचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर

या तपासादरम्यान आतापर्यंत पत्रकार एन राम, सिद्धार्थ वरदराजन आणि परंजॉय गुहा ठाकुर्ता यांच्यासह 13 जणांनी समितीसमोर आपली भूमिका मांडली आहे. यापैकी दोन जणांनी त्यांचे मोबाईल न्यायवैद्यक तपासणीसाठी समितीकडे सुपूर्द केले आहेत. या तपासाकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Pegasus : पेगासस हेरगिरी प्रकरण : समितीचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर
पेगासस हेरगिरी प्रकरण : समितीचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 11:46 PM

नवी दिल्ली : देशभर खळबळ उडवून दिलेल्या पेगासस (Pegasus) स्पायवेअर हेरगिरी प्रकरणात समितीने आपला अंतरिम अहवाल सादर केला आहे. सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)ने ही समिती नेमली असून हेरगिरीच्या तपासासाठी समितीने आणखी वेळ मागितला आहे. न्यायालय या अहवालावर 23 फेब्रुवारी होणार्‍या सुनावणीवेळी विचार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अहवालात समितीने आतापर्यंतच्या तपासातील कोणकोणते निष्कर्ष नोंदवले आहेत, त्याचा अजून उलगडा झालेला नाही.

राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे हेरगिरी प्रकरण

पेगासस हेरगिरीवरून देशभर प्रचंड खळबळ उडाली. विशेषतः राजकीय वर्तुळात या हेरगिरीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठली. या हेरगिरीची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष समिती नेमली आहे. या समितीने सर्वोच्च न्यायालयात अंतरिम अहवाल सादर करून प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यासंदर्भात एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

समितीपुढे 23 जणांनी मांडली आपली भूमिका

सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने या हेरगिरीची गंभीर दखल घेत सखोल तपास सुरू ठेवला आहे. राजकीय वर्तुळातील अनेक लोकांचे, तसेच पत्रकार, न्यायमूर्ती आदी अनेकांची हेरगिरी झाल्याचे उघडकीस आले होते. त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाच्या तपासाला गती देण्यात आली आहे. या तपासादरम्यान आतापर्यंत पत्रकार एन राम, सिद्धार्थ वरदराजन आणि परंजॉय गुहा ठाकुर्ता यांच्यासह 13 जणांनी समितीसमोर आपली भूमिका मांडली आहे. यापैकी दोन जणांनी त्यांचे मोबाईल न्यायवैद्यक तपासणीसाठी समितीकडे सुपूर्द केले आहेत. या तपासाकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राच्या जामिनाला आव्हान

संपूर्ण देशभर गाजलेल्या आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलेल्या उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्राच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. आशिष मिश्रा हा नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर पडला आहे. मात्र त्याला मंजूर झालेल्या जामिनाविरोधात आता लखीमपूर खेरीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. निष्पाप शेतकर्‍यांचा भरधाव कारखाली चिरडण्याचा गंभीर गुन्हा केलेल्या आशिष मिश्राला जामीन मंजूर झालाच कसा? असा सवाल शेतकरी कुटुंबियांनी आपल्या याचिकेतून उपस्थित केला आहे.  (Pegasus espionage case, Interim report of the committee submitted to the Supreme Court)

इतर बातम्या

Lakhimpur Kheri Case : लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राच्या जामिनाला आव्हान; मृत शेतकर्‍यांचे कुटुंबिय सर्वोच्च न्यायालय

Nanded Accident : नांदेडमध्ये पिकअप ऑटो आणि टिप्परचा भीषण अपघात, 5 ठार आणि 5 गंभीर जखमी

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.