AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता काय गय नाही! वाहणधारकांनो काळजी घ्या; नाहीतर तुमच्या चुकीच्या पार्कींगचा फोटो थेट गडकरींना जाईल, तर फोटो पाठवणाऱ्याला 500 रूपये

जो व्यक्ती चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर गाडी उभी करेल त्याला 1000 रुपये दंड करण्यात येईल. तसेच जो फोटो काढून पाठवेल त्याला 500 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल

आता काय गय नाही! वाहणधारकांनो काळजी घ्या; नाहीतर तुमच्या चुकीच्या पार्कींगचा फोटो थेट गडकरींना जाईल, तर फोटो पाठवणाऱ्याला 500 रूपये
केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 9:11 PM

नवी दिल्ली : माझ्याकडे गाडी आहे, ती माझी आहे, हा माझा ओळखीचा आहे, तो माझ्या नात्यातला आहे म्हणत चारचाकी गाडी चुकीच्या पद्धतीने पार्किंग (Parking) कराल तर आता काही धडगत नाही. कारण तुमच्या चुकीच्या पार्कींगचा फोटो हा थेट गडकरींना जाण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर तुमच्या नावाची पावती फाटू शकते. तर ज्याने फोटो फाटवला तो मात्र बक्षीसाला पात्र ठरणार आहे. याबाबत केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवा आणि 500 रुपये मिळवा, असा कायदा लवकरच येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. दिल्लीतील इंडस्ट्रिअल डीकार्बनायझेशन समिटमध्ये (Industrial Decarbonization Summit) ते बोलत होते.

सध्या अनेक शहारांसह छोट्या मोठ्या गावपातळीवरही वाहणधारकांसह अनेकांना चुकीच्या पार्किंगचा फटका बसताना दिसत आहे. तर या चुकीच्या पद्धतीने पार्किंग तसेच बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुककोंडी होताना दिसतं आहे. तर वाहतूक नियंत्रण पोलिसांबरोबर वादही उद्भवतात. त्यामुळे वाहतुककोंडीसह असे वाद होऊ नये यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. तर त्यावर कडक उपाययोजनाही केल्या जात आहे. आता यावर उपाय करण्यासाठी नितीन गडकरी यांनी एक घोषणा केली आहे. तर आता या बाबत कायदाच आणणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

दिल्लीतील इंडस्ट्रिअल डीकार्बनायझेशन समिटमध्ये बोलताना गडकरी म्हणाले, देशात पार्किंगची खूप मोठी समस्या आहे. माणसागणिक गाड्यांची संख्या वाढत जातेय. त्यामुळे रस्त्यावर ट्राफिक तर दिसतेच, शिवाय पार्किंगसाठी जागा नसल्याने रस्त्यावरच चुकीच्या पद्धतीने पार्किंग केली जाते. ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यावर आता “मी एक कायदा करणार आहे. जो व्यक्ती चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर गाडी उभी करेल त्याला 1000 रुपये दंड करण्यात येईल. तसेच जो फोटो काढून पाठवेल त्याला 500 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.” त्यामुळे 500 रूपयांच्या मोहात किती जण फोटो काढतात आणि 1000 रुपये दंड होऊ नये यासाठी किती जन वाहतुकीचे नियम पाळतात हे पहावं लागेल.

तसेच गडकरी यांनी यावेली खंत व्यक्त केली की, लोक त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची जागा बनवत नाहीत, उलट त्यांची वाहने रस्त्यावर पार्किंग करतात.

तसेच ते म्हणाले, “माझ्या नागपुरातील स्वयंपाकीकडेही दोन सेकंड हँड वाहने आहेत. तर आता चार सदस्यांच्या कुटुंबाकडे सहा वाहने आहेत. असे दिसते की दिल्लीवासी भाग्यवान लोक आहेत.  कारण आम्ही त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी रस्ता बनविला आहे. कोणीही पार्किंगसाठी जागा बनवत नाही, बहुतेक त्यांची वाहने रस्त्यावर पार्क करतात. हे योग्य नाही.

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.