मोठी बातमीः 25 वर्षात इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं उद्दिष्ट? ‘हे’ शहर धर्मांधतेचं हब बनवण्याचा होता कट.. धक्कादायक खुलाशात आणखी काय?

पीएफआयचा महाराष्ट्राचा अध्यक्ष शेख नासेर आहे. त्याच्या आदेशानुसार, हे सर्वजण काम करत असल्याची माहिती एटीएसने कोर्टात दिली.  

मोठी बातमीः 25 वर्षात इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं उद्दिष्ट? 'हे' शहर धर्मांधतेचं हब बनवण्याचा होता कट.. धक्कादायक खुलाशात आणखी काय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 12:00 PM

दत्ता कनवटे, औरंगाबादः  आगामी 25 वर्षात भारताला इस्लामिक राष्ट्र (Islamic country) बनवण्याचं PFI अर्थात पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडियाचं (PFI) उद्दिष्ट होतं. यासाठी विविध शहरांत त्यांनी टेरर फंडिंगच्या (Terror Funding) माध्यमातून एनजीओ स्थापन केल्या होत्या. या संस्थांद्वारे देश विघातक कृत्य केले जात होते, असा खुलासा नुकताच झालाय. PFI च्या काही कार्यकर्त्यांना गेल्या काही दिवसात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मिळालेली माहिती एटीएसने कोर्टासमोर मांडली.

एवढंच नाही तर औरंगाबाद शहर हे धर्मांधतेचं हब बनवण्याचा PFI कट होता. त्यासाठी शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात शारीरीक प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली विविध केंद्र सुरु केली होती, अशी माहिती एटीएसच्या चौकशीत उघड झाल्याचा दावा करण्यात आलाय.

एटीएसने रविवारी विशेष जिल्हा सत्र न्यायालयात औरंगाबादमध्ये अटक केलेल्या आरोपींना हजर केलं. यावेळी आरोपींकडून मिळालेली धक्कादायक माहिती एटीएसने कोर्टासमोर सादर केली.

एटीएसने केलेल्या दाव्यानुसार, औरंगाबादमध्ये अटक केलेल्या चौघांपैकी एकजण अत्यंत महत्त्वाचा आरोपी आहे. त्याच्याकडे 19 पानांचं हस्तलिखित दस्तावेज सापडलं आहे….

या दस्तावेजानुसार, 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं पीएफआयचं मिशन होतं, यासाठी विविध ठिकाणी एनजीओ उघडल्या जात होत्या, असं एटीएसने कोर्टात म्हटलंय.

गंभीर बाब म्हणजे बीड, जालन्यासह, औरंगाबादमधील पडेगाव, नारेगाव आदी भागात या आरोपींनी प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था उघडल्या होत्या, अशी माहिती त्यांनी चौकशीतून एटीएसला दिली आहे.

तसेच बंद शेडमधून हे प्रशिक्षण चालत होते. तसेच अटक केलेल्या आरोपींची अनेक बँक खाती होती. त्यातून टेरर फंडिंगसाठीचे आर्थिक व्यवहार चालायचे, असा दावा एटीएसने केला आहे.

पीएफआयचा महाराष्ट्राचा अध्यक्ष शेख नासेर आहे. त्याच्या आदेशानुसार, हे सर्वजण काम करत असल्याची माहिती एटीएसने कोर्टात दिली.

हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल.
विधानसभेतील यशानंतर भाजपच मिशन BMC, मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम?
विधानसभेतील यशानंतर भाजपच मिशन BMC, मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम?.
अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदीर? कोणी दाखल केली याचिका? काय केला दावा?
अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदीर? कोणी दाखल केली याचिका? काय केला दावा?.
'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?
'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?.
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला.
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?.
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.