गेल्या 2 वर्षांपासून NIA च्या रडारवर PFI, छाप्यामागील खरी कहाणी…

गुरुवारी सकाळी छापेमारीची बातमी मिळाली. एजन्सीचे अधिकारी छापेमारी करत असताना कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. परंतु, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान त्याठिकाणी तैनात होते.

गेल्या 2 वर्षांपासून NIA च्या रडारवर PFI, छाप्यामागील खरी कहाणी...
या कट्टरपंथी संघटनेविरोधात छापेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 7:33 PM

केंद्रीय एजन्सी एनआयए आणि ईडीनं कट्टरपंथी संघटन पापुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) विरोधात छापे मारण्यात आले. या संघटनेवर बंदी आणण्याची मागणी समोर येत आहे. या संघटनेची स्थापना सामाजिक कार्यासाठी झाली. पण, ही संघटना नेहमी वादग्रस्त राहिली. या संघटनेविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

16 वर्षांनंतर पीएफआयचा परिसर आणि 100 पेक्षा जास्त नेत्यांवर राष्ट्रीय तपास एजन्सी आणि अंमलबजावणी संचालनालय यांनी गुरुवारी 11 राज्यात छापे मारले. दहशतवादी कारवायांसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात संघटनेचे अध्यक्ष ओएमए सलाम यांचाही यात समावेश आहे.

केंद्रीय एजन्सीच्या विरोधात पीएफआयनं शुक्रवारी देशभर विरोध प्रदर्शनाचा इशारा दिलाय. पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी केरळमध्ये प्रदर्शन केलं. आरएसएस नियंत्रित सरकारचा निषेध करण्यासाठी 23 सप्टेंबरला केरळमध्ये आंदोलन केलं जाईल, असं संघटनेनं जाहीर केलं.

आंदोलन सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजतापर्यंत राहील. गुरुवारी सकाळी छापेमारीची बातमी मिळाली. एजन्सीचे अधिकारी छापेमारी करत असताना कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. परंतु, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान त्याठिकाणी तैनात होते.

पीएफआय आणि वरिष्ठ 100 नेते एनआयएच्या रडारवर होते. दहशतवादी घटनांत सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. फंडिंग पॅटर्नची तपासणी केली जात आहे. पीएफआय या संघटनेची स्थापना बाबरी मश्जिद विध्वंसानंतर एका वर्षानं झाली. 2002 आणि 2003 मध्ये सांप्रदायिक दंगे झाले. त्यात दोन लोकं मारले गेले होते. त्यानंतर पीएफआय ही संघटना समोर आली.

मुस्लिमांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी पीएफआय या संघटनेची स्थापना करण्यात आली. एका प्राध्यापकाचा हात कापला गेला होता. धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा या संघटनेवर आरोप आहे. केरळ, तामिलनाडू आणि कर्नाटकात सारख्या विचारधारेच्या नेत्यांनी 2006 मध्ये या संघटनेची स्थापना केली.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.