अलिगढ मुस्लिम विद्यापीठात ‘मिनी इंडिया’, मोदींकडून पुन्हा ‘सबका साथ’चा नारा

अलिगड मुस्लिम विद्यापीठात मिनी इंडियाच पाहायला मिळतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएमयूचा गौरव केला. (PM Modi addresses centenary celebrations of amu today )

अलिगढ मुस्लिम विद्यापीठात 'मिनी इंडिया', मोदींकडून पुन्हा 'सबका साथ'चा नारा
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 12:17 PM

नवी दिल्ली: अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या ग्रंथालयात कुराणही आहे आणि गीता-रामायणाचा अनुवादही आहे. एक भारत, श्रेष्ठ भारतचं हे विद्यापीठातील चित्रं अत्यंत चांगलं आहे, असं सांगतानाच अलिगड मुस्लिम विद्यापीठात मिनी इंडियाच पाहायला मिळतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएमयूचा गौरव केला. यावेळी त्यांनी सबका साथ सबका विकासचा नारा देतानाच भारताच्या जडणघडणीत मुस्लिम स्कॉलर आणि एएमयूचं मोठं योगदान असल्याचंही स्पष्ट केलं. (PM Modi addresses centenary celebrations of amu today)

अलीगड मुस्लिम विद्यापीठाला आज 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. विद्यापीठाच्या या शताब्दी समारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करत होते. यावेळी त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापाठीच्या शैक्षणिक कार्याची मुक्तकंठाने स्तुती केली. समाजात वैचारिक मतभेद असतात. पण जेव्हा राष्ट्राच्या विकासाचा मुद्दा येतो तेव्हा हे मतभेद दूर ठेवले पाहिजे. देशातील कोणत्याही धर्माचा आणि जातीचा व्यक्ती असो प्रत्येकाने देशाच्या विकासात योगदान दिलं पाहिजे, असं मोदी म्हणाले. एएमयूमधून अनेक तरुण तयार झाले. त्यांनी आपले विचार बाजूला ठेवून देशासाठी त्याग केला. देशाच्या जडणघडणीत अतुलनीय योगदान दिलं. राजकारण हा समाजाचा एक भाग असतो. राजकारण, सत्तेच्या पलिकडे समाज असतो. देशातील प्रत्येक समाजाला पुढे आणण्यासाठी आपल्याला योगदान दिलं पाहिजे, असं मोदी म्हणाले.

मतभेदांवर वेळ वाया घालवू नका

जेव्हा एखादं लक्ष्य ठेवून आपण मार्गक्रमण करतो, तेव्हा काही लोक त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. अशी लोक प्रत्येक समाजात असतात. पण त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून आपल्याला पुढे गेले पाहिजे. गेल्या शतकात मतभेदांच्या नावाखाली आपण आपला प्रचंड वेळ वाया घालवला आहे. आता मतभेदांच्या नावावर वेळ वाया घालवणं योग्य ठरणार नाही. आत्मनिर्भर भारताची निर्मिती करायची असेल आणि आपल्याला विकासाचं लक्ष्य गाठायचं असेल तर मतभेद बाजूला ठेवलेच पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. (PM Modi addresses centenary celebrations of amu today)

मोदींकडून विद्यार्थ्यांना टास्क

यावेळी मोदींनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांना काही टास्क दिले. एएमयूला शंभर वर्षे पूर्ण झाले आहेत. अशावेळी वसतिगृहातील शंभर विद्यार्थ्यांनी संशोधन केलं पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांबाबत संशोधन करावं. या स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास अत्यंत कमी लोकांना माहीत आहे. यात 75 आदिवासी स्वातंत्र्य सैनिक आहेत. 25 महिला स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांची माहिती गोळा करा. जुन्या पांडुलिपींनी डिजीटल रुपात संवर्धित करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. (PM Modi addresses centenary celebrations of amu today)

संबंधित बातम्या:

PM Modi addresses in AMU : AMUमध्ये मिनी इंडिया दिसून येतो, ही विविधता देशाची ताकद: मोदी

AMUच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधान मोदी सहभागी होणार

ममतांच्या मदतीला पवार, प्रचारही करणार?

(PM Modi addresses centenary celebrations of amu today)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.