‘व्होकल फॉर लोकल’ ते एक दिवा सैनिकांसाठी लावा; मोदींची ‘मन की बात’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 70व्या मन की बातमधून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'व्होकल फॉर लोकल'पासून ते एक दिवा सैनिकांसाठी लावण्याचं आवाहन केलं.

'व्होकल फॉर लोकल' ते एक दिवा सैनिकांसाठी लावा; मोदींची 'मन की बात'
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 12:24 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 70व्या मन की बातमधून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘व्होकल फॉर लोकल’पासून ते एक दिवा सैनिकांसाठी लावण्याचं आवाहन केलं. (PM Modi advocates for ‘Vocal for local’ in ‘Mann Ki Baat’)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. हा असत्यावर सत्याने विजय मिळविण्याचा दिवस आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहून कोणत्याही संकटावर मात केली पाहिजे, असं सांगताना सण-उत्सवात स्वदेशी उत्पादनांचीच खरेदी करा. खरेदी करताना स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्या. ‘Vocal for Local’चा संकल्प कायम लक्षात ठेवा, असं आवाहन मोदींनी केलं.

सण-उत्सवाच्या काळात आपल्या वीर जवानांचंही स्मरण ठेवा. सणांच्या काळातही देशाच्या सीमेवर आपले जवान देशाचं संरक्षण करत आहेत. त्यामुळे या जवानांसाठी घरात एक दिवा लावून त्यांचा सन्मान करा, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी खादीच्या वाढत्या लोकप्रियतेचीही माहिती दिली. जगात आता खादीची लोकप्रियता वाढत आहे. जगात अनेक ठिकाणी खादीचं उत्पादन केलं जात आहे. मेक्सिकोतील ओहाकामध्ये अनेक गावात तर स्थानिक लोक खादीचं उत्पादन करत आहेत. दिल्लीच्या कनॉट पॅलेसच्या स्टोअर्समध्ये गांधी जयंती दिनी एका दिवसात खादींची कोट्यवधीची विक्री झाली. त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात मास्कही अधिक लोकप्रिय होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी येत्या 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचंही सांगितलं. (PM Modi advocates for ‘Vocal for local’ in ‘Mann Ki Baat’)

संबंधित बातम्या:

PM Narendra Modi | मन की बात | प्रत्येक घरात वीर जवानांच्या सन्मानासाठी एक दिवा लावा, पंतप्रधानांचं आवाहन

देशातील इंचभर जमीनही बळकावू देणार नाही; राजनाथ सिंह यांचा चीनला इशारा

Pankaja Munde LIVE | दसरा मेळावा; पंकजा मुंडे थोड्याच वेळात कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार

(PM Modi advocates for ‘Vocal for local’ in ‘Mann Ki Baat’)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.