गुजरातला एक हजार कोटींचं पॅकेज, वादळात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख; मोदींची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या गुजरातची पाहणी केली. (PM Modi announces 1,000 cr immediate relief for storm-hit Gujarat)

गुजरातला एक हजार कोटींचं पॅकेज, वादळात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख; मोदींची मोठी घोषणा
narendra modi
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 7:11 PM

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या गुजरातची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी गुजरातला एक हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आहे. तसेच वादळामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. (PM Modi announces 1,000 cr immediate relief for storm-hit Gujarat)

तौक्ते वादळामुळे गुजरात आणि दीव दमणचं मोठं नुकसान झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या भागाची हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही होते. यावेळी त्यांनी राज्याला एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येत असल्याचं जाहीर केलं. तसेच वादळातील बळींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना 50 हजाराची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. त्याशिवाय केंद्र सरकार गुजरातमध्ये इंटर मिनिस्ट्रियल ग्रुप पाठवेल. हा ग्रुप राज्यातील नुकसानीची पाहणी करून केंद्राला त्याची माहिती देईल, असं मोदींनी सांगितलं.

इतर राज्यांनाही मदत करणार

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या सर्व राज्यांना केंद्राकडून लवकरच मदत करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती राज्यांनी केंद्राला द्यावी. त्यानुसार राज्यांना मदत केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. या पाहणीनंतर मोदींनी ट्विटही केलं आहे. चक्रीवादळामुळे गुजरात आणि दीवचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे या भागांची पाहणी केली. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या सर्व राज्यांसोबत केंद्र सरकार काम करत आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अहमदाबादेत आढावा बैठक

गुजरात आणि दीवची हवाई पाहणी केल्यानंतर मोदींनी अहमदाबादमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. याप्रसंगी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचनाही केल्या.

वादळामुळे 13 जणांचा मृत्यू

तौक्ते चक्रीवादळ सोमवारी रात्री साडे दहा वाजता सौराष्ट्रला धडकले. त्यानंतर किनारपट्टी भागात जमीन धसण्याचे प्रकार सुरू झाले. सुमारे अडीच ते तीन तास जमीन धसण्याचे प्रकार सुरू होते. वादळामुळे सौराष्ट्रातील 21 जिल्ह्यातील 84 तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. आता पाऊस थांबला असला तरी या वादळी पावसामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जागोजागी मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. विजेचे खांब, सोलर पॅनलही उन्मळून पडले आहेत. अनेक ठिकाणी तर मोबाईल टॉवरही पडले आहेत. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. गावांमध्ये पावसाचे पाणी भरल्याने अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. जाफराबादमध्ये तर पूरस्थिती निर्माण झाली आहे.

2400 गावात वीज नाही

वादळामुळे गुजरातमध्ये 40 हजार वृक्ष उन्मळून पडले आहेत. 16,500 कच्ची घरेही पडली आहेत. 2400 हून अधिक गावांमध्ये अजूनही वीज नाही. अनेक ठिकाणी विजेचे खांब तुटले आहेत. 122 कोविड हॉस्पिटलमध्ये वीज नसल्याने अंधार पसरला आहे. वादळामुळे राज्यात लसीकरण कार्यक्रम थांबवण्यात आला आहे. येत्या 20 मे पासून लसीकरणाचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (PM Modi announces 1,000 cr immediate relief for storm-hit Gujarat)

संबंधित बातम्या:

Cyclone Tauktae: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात, दीवमध्ये; वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार

Tauktae : वादळाचे नाव आठ अक्षरीच का ठेवले जाते? जाणून घ्या याबाबत सर्व माहिती

भय इथले संपले नाही!, ‘तौक्ते’नंतर आता ‘Yaas’ चक्रीवादळाचा धोका; ‘या’ राज्यांमध्ये अ‍ॅलर्ट जारी

(PM Modi announces 1,000 cr immediate relief for storm-hit Gujarat)

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.