G20 शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान मोदींची बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या आधी पंतप्रधान मोदींनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांची भेट घेतली. जगातील प्रमुख नेत्यांचे दिल्लीत स्वागत करताना मला खूप आनंद होत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
G-20 Summit : भारतात G20 परिषद सुरू होण्याच्या एक दिवस आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांच्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. पंतप्रधान मोदींनी दिल्लीत दोन्ही राष्ट्रप्रमुखांचे अतिशय उत्साहाने स्वागत केले.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करून म्हटले आहे – भारत मैत्री आणि सहकार्याचे बंध अधिक दृढ करण्यास उत्सुक आहे. मी G2O शिखर परिषदेत सर्व जागतिक नेते आणि शिष्टमंडळांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेईन. मला विश्वास आहे की आमचे पाहुणे भारतीय आदरातिथ्याचा आनंद घेतील.
ते म्हणाले की, राष्ट्रपती ९ सप्टेंबर रोजी सर्व पाहुण्यांसाठी डिनरचे आयोजन करतील. 10 सप्टेंबर रोजी राजघाटावर नेते महात्मा गांधींना आदरांजली अर्पण करतील. त्याच दिवशी समारोप समारंभात, G20 नेते निरोगी ‘एक पृथ्वी’ साठी ‘एक कुटुंब’ म्हणून एकत्र काम करून, शाश्वत आणि न्याय्य ‘एक भविष्य’ साठी त्यांची सामूहिक दृष्टी सामायिक करतील.
मॉरिशसच्या पंतप्रधानांकडून कौतुक
मॉरिशसच्या पंतप्रधानांनी अर्थव्यवस्था आणि विज्ञान क्षेत्रात भारताच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. भारत प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या धोरणात जगावर प्रभाव टाकण्याची क्षमता आहे. G20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराचेही त्यांनी कौतुक केले आहे.