MP: पंतप्रधान मोदींच्या स्वागतापूर्वी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह 110 मंत्री, आमदारांचा RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य
मध्य प्रदेश सरकारने आदिवासी गौरव दिवसानिमीत्त, 15 नोव्हेंबरला भोपाळमधील जांबूरी मैदानावर आदिवासी अधिवेशन आयोजित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. भोपाळ भेटीसाठी पंतप्रधानांचे स्वागत करणार्या सर्वंसाठी, नेते-मंत्रींसह मध्य प्रदेश सरकारने RT-PCR (कोविड 19 चाचणी) अनिवार्य केली आहे.
मध्य प्रदेश सरकारने आदिवासी गौरव दिवसानिमीत्त, 15 नोव्हेंबरला भोपाळमधील जांबूरी मैदानावर आदिवासी अधिवेशन आयोजित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. भोपाळ भेटीसाठी पंतप्रधानांचे स्वागत करणार्या सर्वंसाठी, नेते-मंत्रींसह मध्य प्रदेश सरकारने RT-PCR (कोविड 19 चाचणी) अनिवार्य केली आहे. विमानतळ ते हेलिपॅडपर्यंत आणि कार्यक्रमादरम्यान स्टेजच्या आसपास असणारे अधिकारी-कर्मचारीमिळून एकूण 110 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत आमदार, मंत्र्यांचाही समावेश आहे. राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही RT-PCR चाचणी करतील. (Pm Modi Madhya Pradesh Visit for aadivasi gaurav divas festival 110 ministers mla including governor chief minister will have to take covid 19 negative report)
अनेक नेते विमानतळवर मोदींची भेट घेणार आहेत
पंतप्रधानांच्या सुरक्षा आणि कोविड प्रोटोकॉल अंतर्गत कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. अशा सर्व लोकांचा 48 तास अगोदर कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट येणे आवश्यक आहे. यासाठी तीन ठिकाणी- मंत्रालय, भाजप कार्यालय आणि जेपी रुग्णालय येथे विशेष शिबिरे लावण्यात आले आहेत.
15 नोव्हेंबरला पंतप्रधानांचे विमानतळावर आगमन होताच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह 8 मंत्री-अधिकारी त्यांचे स्वागत करतील. याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गौतम, आमदार रामेश्वर शर्मा, मुख्य सचिव इक्बाल सिंह बैंस, डीजीपी विवेक जोहरी आणि दोन सैन्य अधिकारी येथे उपस्थित राहणार आहेत. अर्थमंत्री जगदीश देवरा, वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंगही असतील. पंतप्रधान मोदी हे मध्य प्रदेशातील आदिवासी मंत्री, खासदार आणि आमदारांची विमानतळावर भेट घेणार आहेत. केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांच्यासह 20 हून अधिक नेते येथे उपस्थित राहणार आहेत. मोदी या नेत्यांशीही चर्चा करण्याची शक्यता आहे.
आदिवासी परिषदेच्या मंचावर पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांच्याशिवाय 13 आदिवासी नेते उपस्थित राहणार आहेत.
बुधवारी, केंद्रीय मंत्रिमंडळाने बिरसा मुंडा यांच्या जयंती स्मरणार्थ आणि भारतीय इतिहास आणि संस्कृतीत अनुसूचित जमातींच्या सदस्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला होता.
हे ही वाचा –
Milind Teltumbde | ज्याच्या डोक्यावर 1 कोटी 20 लाखाचं इनाम, तो देशातला सर्वात मोठा नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे ठार!
दरोड्याच्या तयारीत असलेल्या 6 जणांच्या टोळीला भोसरी पोलिसांनी इंगा दाखवला, तिथल्या तिथं नांग्या ठेचल्या!
Delhi Air Pollution: सोमवारपासून 1 आठवडा शाळा बंद, सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना, वायू प्रदूषणामूळे दिल्लीची परिस्थिती धोकादायक
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ट्रेनमध्ये आता फक्त शाकाहारी भोजनच मिळणार https://t.co/JXuGnevLOk #Railway #IRCTC #vegetarian #Food
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2021