PM Modi Mother passes away LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक, राजकीय वर्तुळातून हीराबेन यांना श्रद्धांजली
PM Modi Mother passes away LIVE updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक, राजकीय वर्तुळातून हीराबेन यांना श्रद्धांजली
अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं आज पहाटे निधन झालं. हीराबेन यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 100व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या निधनाची बातमी ट्विट केली. त्यांच्या निधनावर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. आईच्या अंत्यसंस्कारासाठी मोदी स्वत: अहमदाबादला येणार असून महाराष्ट्रासह देशातील अनेक दिग्गज नेतेही अहमदाबादला येणार आहेत. या मोठ्या बातम्यांसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन लढ्याच्या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
शिर्डी – साई पालखी घेऊन येणाऱ्यावर गोळीबार
शिर्डीजवळील सावळीविहीर येथील घटना
अज्ञात तरुणाच्या गोळीबारात एक जण जखमी
खांद्याला गोळी लागल्याने एक जण जखमी
वैयक्तिक किंवा पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती
मुंबईतील गोरेगाव येथून निघालेल्या साई पालखीत गोळीबार
जखमीवर शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
-
हीरा बा यांना साश्रू नयनांनी निरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या पार्थिवाला अग्नि दिला
हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार हीरा बा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले
हीरा बा यांच्या पार्थिवाला अग्नि देण्यात आला तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले
-
-
हीराबेन मोदी यांची अंत्ययात्रा सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आईच्या पार्थिवाला खांदा
गांधीनगरच्या स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
अंत्ययात्रेला गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसहीत अनेक मान्यवर उपस्थित
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हीराबाबेन मोदी यांना अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचे समजून दुःख झाले.
त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला.
मातृवियोगाचे दुःख मोठे असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो.
आम्ही सर्व पंतप्रधान आणि मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत.
स्वर्गीय हीराबाबेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
-
मायावती यांची हीराबेन यांना श्रद्धांजली
बसपा नेत्या मायावती यांनी हीराबेन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे
मोदी यांच्या मातोश्री हीराबेन यांच्या निधनाचं वृत्त अति दु:खद आहे
त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत
या दु:खद प्रसंगी मोदी आणि त्यांच्या सर्व समर्थकांना दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो
-
-
हीराबेन यांचं संघर्षमय जीवन नेहमी स्मृतीत राहील: अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हीराबेन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे
आई ही एका व्यक्तीच्या आयुष्यात पहिली मित्र आणि गुरु असते, तिच्या जाण्याने प्रचंड हानी होते
हीरा बा यांनी ज्या परिस्थितीत संघर्षाचा सामना करत कुटुंबाचं पालनपोषण केलं ते सर्वांसाठी आदर्श आहे
त्यांचं त्यागपूर्ण तपस्वी जीवन सर्वांच्या स्मृतीत राहील
संपूर्ण देश या दु:खद प्रसंगी मोदी आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहे
कोट्यवधी लोकांची प्रार्थना तुमच्यासोबत आहे, ओम शांती
-
सुप्रिया सुळे यांनी हिराबेन मोदी यांना वाहिली श्रद्धांजली
हिराबेन मोदी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झाले
मोदी कुटुंबाला या दुखाःतून सावरण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो
खासदार सुप्रिया सुळे यांनी हिराबेन मोदी यांना वाहिली श्रद्धांजली
-
नितीन गडकरींकडून हीराबेन यांना श्रद्धांजली
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हीराबेन मोदी यांना श्रद्धांजली वाहिली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूज्यनीय आई हीराबेन यांच्या निधनाचं वृत्त दु:खद आहे
त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली
हीराबा अत्यंत संघर्षपूर्ण आयुष्य जगल्या
त्यांनी आपल्या कुटुंबाला चांगले संस्कार दिले. त्यामुळेच नरेंद्र मोदींसारखं नेतृत्व देशाला मिळालं
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांचं वयाच्या 100व्या वर्षी निधन झालं
आईच्या निधनाचं वृत्त कळताच मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत
आज दुपारी मोदी यांच्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत
-
हीराबेन मोदी यांच्या पार्थिवावर गांधीनगरात होणार अंत्यसंस्कार
गांधीनगरच्या सेक्टर 3मध्ये होणार अंत्यसंस्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगरकडे रवाना
देशभरातील विविध पक्षांचे नेते गांधीनगरला येणार
Published On - Dec 30,2022 7:48 AM