‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूँ…’, मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ, केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाकुणाला स्थान?
नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी यांच्या शपथविधीमुळे राज्यभरात भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. देशभरात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आनंद साजरा केला जातोय.
भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज अखेर तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील एनडीएच्या अनेक खासदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृ्त्वात एनडीएचं ही सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन झालं आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राष्ट्रपती भवन परिसरात नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा शाही सोहळा पार पडला. या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. तसेच परदेशातील मंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहिलेले बघायला मिळाले.
अठराव्या लोकसभेचा निकाल हा गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा थोडासा वेगळा लागला आहे. या निवडणुकीत भाजपच्या 63 जागा घटल्या आहेत. तर काँग्रेसच्या 47 जागा वाढल्या आहेत. तरीही या निवडणुकीत एनडीए आघाडी ही इंडिया आघाडीवर सरस ठरली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एनडीए आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. या निवडणुकीत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पक्ष किंगमेकर ठरले आहेत. हे दोन्ही पक्ष एनडीएसोबत खमकेपणाने सोबत राहिल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचं नवं सरकार स्थापन झालं आहे.
महाराष्ट्रातील 6 खासदांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये संधी
नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील खासदारांनादेखील संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार पीयूष गोयल यांनीदेखील मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. याशिवाय खासदार प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, रामदास आठवले हे देखील आज मंत्रिमंडळाची शपथ घेत आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य मंत्रिमंडळातील मंत्र्याची नावे
गुजरात –
- 1.अमित शाह
- 2.एस जयशंकर
- 3.मनसुख मंडाविया
- 4.सीआर पाटिल
- 5.नीमू बेन बंभनिया
हिमाचल –
- 1.जे पी नड्डा
ओडिशा –
- 1.अश्विनी वैष्णव
- 2.धर्मेंद्र प्रधान
- 3.जुअल ओरम
कर्नाटक –
- 1.निर्मला सीतारमण
- 2.एचडीके
- 3.प्रहलाद जोशी
- 4.शोभा करंदलाजे
- 5.वी सोमन्ना
महाराष्ट्र
- 1.पीयूष गोयल
- 2.नितिन गडकरी
- 3.प्रतापराव जाधव
- 4.रक्षा खडसे
- 5.रामदास अठावले
- 6.मुरलीधर मोहोल
गोवा –
- 1.श्रीपद नाइक
जम्मू-कश्मीर –
- 1.जितेंद्र सिंह
मध्य प्रदेश –
- 1.शिवराज सिंह चौहान
- 2.ज्योतिरादित्य सिंधिया
- 3.सावित्री ठाकुर
- 4.वीरेंद्र कुमार
उत्तर प्रदेश –
- 1.हरदीप सिंह पुरी
- 2.राजनाथ सिंह
- 3.जयंत चौधरी
- 4.जितिन प्रसाद
- 5.पंकज चौधरी
- 6.बी एल वर्मा
- 7.अनुप्रिया पटेल
- 8.कमलेश पासवान
- 9.एसपी सिंह बघेल
बिहार –
- 1.चिराग पासवान
- 2.गिरिराज सिंह
- 3.जीतन राम मांझी
- 4.रामनाथ ठाकुर
- 5.ललन सिंह
- 6.निर्यानंद राय
- 7.राज भूषण
- 8.सतीश दुबे
अरुणाचल प्रदेश –
- 1.किरन रिजिजू
राजस्थान
- 1.गजेंद्र सिंह शेखावत
- 2.अर्जुन राम मेघवाल
- 3.भूपेंद्र यादव
- 4.भागीरथ चौधरी
हरियाणा
- 1.एमएल खट्टर
- 2.राव इंद्रजीत सिंह
- 3.कृष्ण पाल गुर्जर
केरळ
- 1.सुरेश गोपी
- 2.जॉर्ज कुरियन
तेलंगणा
- 1.जी किशन रेड्डी
- 2.बंदी संजय
तमिलनाडू
- 1.एल मुरुगन
झारखंड
- 1.संजय सेठ
- 2.अन्नपूर्णा देवी
छत्तीसगढ
- 1.तोखन साहू
आंध्र प्रदेश
- 1.डॉ.चंद्रशेखर पेम्मासानी
- 2.राम मोहन नायडू किंजरापु
- 3.श्रीनिवास वर्मा
पश्चिम बंगाल
- 1.शांतनु ठाकुर
- 2.सुकांत मजूमदार
पंजाब –
- 1.रवनीत सिंह बिट्टू
आसाम –
- 1.सर्बानंद सोनोवाल
- 2.पबित्रा मार्गेह्रिता
उत्तराखंड
- 1.अजय टम्टा
दिल्ली
- 1.हर्ष मल्होत्रा