पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुलती नर्मदाबेन मोदी यांचं कोरोनाने निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चुलती नर्मदाबेन मोदी यांचं कोरोनाने निधन झालं आहे. (PM Modi's aunt dies during Covid-19 treatment)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुलती नर्मदाबेन मोदी यांचं कोरोनाने निधन
Breaking News
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 8:48 PM

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चुलती नर्मदाबेन मोदी यांचं कोरोनाने निधन झालं आहे. त्या 80 वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु होते. (PM Modi’s aunt dies during Covid-19 treatment)

नर्मदाबेन मोदी या मुलांसोबत शहरातील न्यू रनिप येथे राहत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान बंधू प्रल्हाद मोदी यांनी नर्मदाबेन मोदी यांचं निधन झाल्याचं सांगितलं. कोरोना झाल्यामुळे नर्मदाबेन यांना दहा दिवसांपूर्वी सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोना संसर्गामुळे त्यांची प्रकृती दिवसे न् दिवस खालावत होती. आज त्यांची प्रकृती आणखीनच बिघडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली, असं प्रल्हाद मोदी यांनी सांगितलं.

नर्मदाबेन यांचे पती जगजीवनदास मोदी यांचं यापूर्वीच निधन झालं आहे. जगजीवनदास मोदी हे नरेंद्र मोदी यांचे वडील दामोरदास मोदी यांचे लहान भाऊ होते.

24 तासात 170 जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये गेल्या 24 तासात 14352 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 24 तासात 170 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 7,803 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus Live Update : पुण्यात दिवसभरात 3871 नवे कोरोनाबाधित, 82 रुग्णांचा मृत्यू

कोरोना संकटात आम्ही मूकदर्शक बनू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला 7 सवाल

पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनची आवश्यकता आहे का?; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात?

(PM Modi’s aunt dies during Covid-19 treatment)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.