शो मस्ट गो ऑन, सकाळी आईला अग्नी दिला, नंतर मोदी यांनी भावूक होत बंगाली नागरिकांची मागितली माफी; कारण काय?

मला पश्चिम बंगालला जायचं होतं. पण खासगी कारणामुळे मी येऊ शकलो नाही. मी बंगालच्या लोकांची माफी मागतो. बंगालच्या पवित्र भूमीला नमन करण्याची मला ही संधी मिळाली आहे.

शो मस्ट गो ऑन, सकाळी आईला अग्नी दिला, नंतर मोदी यांनी भावूक होत बंगाली नागरिकांची मागितली माफी; कारण काय?
शो मस्ट गो ऑन, सकाळी आईला अग्नी दिला, नंतर मोदी यांनी भावूक होत बंगाली नागरिकांची मागितली माफी; कारण काय?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 1:30 PM

नवी दिल्ली: व्यक्तिगत आयुष्यात कितीही संकट आलं तरी काही लोक कर्तव्यनिष्ठेला अधिक महत्त्व देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यापैकीच एक आहेत. सकाळी आईच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा कामाला लागले. शो मस्ट गो ऑन म्हणत त्यांनी बंगालमधील एका कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी मोदी बंगालला जाणार होते. पण जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली. पहले मां का फर्ज फिर देश का कर्ज, असं म्हणत त्यांनी बंगाली जनतेची माफीही मागितली. त्यावेळी मोदी अत्यंत भावूक झाले होते. मोदी यांनी माफी मागितल्यानंतर सर्वांचीच मनं हेलावून गेली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं आज पहाटे निधन झालं. वयाच्या 100व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गांधीनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आईच्या निधनाचं वृत्त कळताच मोदी अहमदाबादला आले. त्यांनी आईच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर स्वत: आईच्या पार्थिवाला खांदा दिला. अनवाणी पायाने ते आईच्या पार्थिवाला खांदा देत स्मशानभूमीपर्यंत आले. तिथे मंत्रविधी झाल्यानंतर आईच्या पार्थिवाला अग्नी दिला. आईची चिता जळत असताना मोदी स्मशानभूमीतच उभे होते. आईच्या पेटत्या चितेकडे मोदी पाहत होते. यावेळी त्यांचा चेहरा अत्यंत भावूक झालेला होता.

त्यानंतर मोदी परत दिल्लीला आले. पण कर्तव्यनिष्ठा अत्यंत महत्त्वाची. शो मस्ट गो ऑन हेच जीवनाचं खरं तत्त्व आहे, असं समजून त्यांनी आई गेल्याचं दु:ख उरात दाबून पुन्हा नित्य कामांना सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोलकात्यातील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

तसेच रिमोट बटन दाबून कोलकाता येथील रेल्वेच्या अनेक योजनांचं लोकार्पणही केलं. यावेळी मोदींनी बंगाली जनतेशी संवादही साधला. हा संवाद साधत असताना मोदी भावूक झाले होते.

ओ ओमार देशेर माटी, तोमार पौरे ठेकाई माथा यानि, म्हणजे मी माझ्या मातृभूमीसमोर नतमस्तक होत आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात मातृभूमीला सर्वोच्च माणून आपल्याला काम केलं पाहिजे. आज संपूर्ण जग भारताकडे विश्वासाने पाहत आहे, असं मोदी म्हणाले. कोलकात्यातील कार्यक्रमातील मोदी यांचं विधान कर्तव्य आणि पराकष्ठेचा दाखला आहे.

मला पश्चिम बंगालला जायचं होतं. पण खासगी कारणामुळे मी येऊ शकलो नाही. मी बंगालच्या लोकांची माफी मागतो. बंगालच्या पवित्र भूमीला नमन करण्याची मला ही संधी मिळाली आहे. बंगालच्या कणाकणात स्वातंत्र्याचा इतिहास सामावलेला आहे. याच भूमीतून वंदे मातरमचा जयघोष झाला. त्याच धरतीवर वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जात आहे, असं मोदी म्हणाले.

इतिहासात 30 डिसेंबरला अधिक महत्त्व आहे. 30 डिसेंबर 1943 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोसयांनी अंदमानमध्ये तिरंगा फडकावून स्वातंत्र्याचं रणशिंग फुंकलं होतं. याच घटनेला 75 वर्ष झाल्यावर मी 2018 मध्ये अंदमानला गेलो होतो. त्या ठिकाणी एका बेटाला सुभाषबाबूंचं नावही दिलं होतं, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....