पंतप्रधान मोदी आज 2 मोठ्या अभियानांचं उद्घाटन करणार, स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 आणि अमृत 2.0 ने शहरांचं चित्र बदलणार

पहिली मोहिम आहे PM मोदी स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 (SBM-U 2.0) आणि दुसरी मोहिम शहरी सुधारणांसाठी अटल मिशन 2.0 (AMRUT 2.0) हे 2 मिशन लाँच करणार आहे.

पंतप्रधान मोदी आज 2 मोठ्या अभियानांचं उद्घाटन करणार, स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 आणि अमृत 2.0 ने शहरांचं चित्र बदलणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 11:23 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी, दोन मोठ्या मोहिमा सुरू करणार आहेत. पहिली मोहिम आहे PM मोदी स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 (SBM-U 2.0) आणि दुसरी मोहिम शहरी सुधारणांसाठी अटल मिशन 2.0 (AMRUT 2.0) हे 2 मिशन लाँच करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मोहिमांची सुरुवात डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये होणार आहे. ( pm-modi-to-launch-swachh-bharat-mission-urban-2-and-amrut-2-on-1st-october-SBM-U 2.0)

सर्व शहरांना ‘कचरामुक्त’ आणि ‘पाणी सुरक्षा’ करण्याच्या उद्देशाने SBM-U 2.0 आणि AMRUT 2.0 या मोहिमा तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या मोहिमांतर्गत भारतातील जलद शहरीकरणाच्या आव्हानांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी काम केलं जाईल. याशिवाय, शाश्वत विकास ध्येय 2030 साध्य करण्यासाठी या मोहिमांचा उपयोग होईल. या कार्यक्रमाला सर्व केंद्रीय मंत्री, गृहनिर्माण मंत्री, शहरी विकास राज्यमंत्री, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे शहरी विकास मंत्रीही उपस्थित असतील.

काय आहे स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0?

स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 मध्ये सगळ्या शहरांन कचरामुक्त बनवणं आणि अमृत मिशन अंतर्गत येणाऱ्या शहरांमध्ये धूर आणि काळ्या पाण्याचं शुद्धीकरण करणं सामाविष्ट आहे. याचा खर्च तब्बल 1.41 लाख कोटी रुपये आहे. या अभियानात शहरांचं लोकसंख्या आणि प्रदुषणाच्या बेसेसवर वर्गीकरण करण्यात आलं आहे.

काय आहे AMRUT 2.0 चा लक्ष्य?

AMRUT 2.0 ही योजन जवळपास 2.654 कोटी सीवेज किंवा सेफ्टिक टँक पुरवण्यासाठी बनवण्यात आली आहे. यात तब्बल 2.68 कोटी नळ कनेक्शन, 500 शहरांमध्ये सीवेज आणि सेफ्टीक टँकचं 100 टक्के कव्हरेज देण्यात येणार आहे. याशिवाय 4.700 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व घऱांमध्ये नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. याशिवाय, भूजल पातळी वाढवण्यासाठीही या योजनेत प्रयत्न केला जाणार आहे. शहरांमध्ये योजनेच्या बाबतीत प्रतिस्पर्धा वाढावी यासाठी पेयजल सर्व्हेक्षण ही स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे. अमृत 2.0 चा अंदाजित खर्च तब्बल 2.87 कोटी रुपये आहे.

आधीच्या स्वच्छता मिशन-शहरी आणि AMRUT चा परिणाम काय?

SBM-U और AMRUT या दोन्ही योजनांमध्ये मागच्या 7 वर्षात अनेक चांगल्या गोष्टी झाल्या आहेत. दोन्ही मिशनमुळे नागरिकांना घरापर्यंत स्वच्छ पाणी मिळालं आहे. पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या आहेत. उघड्यावर शौच करण्याचं प्रमाण हे अत्यल्प झालं आहे. अनेक गावं ही हगणदारीमुक्त झाली आहेत. 70 टक्के घन कचऱ्यावर आता प्रक्रिया होत आहे. अमृत योजनेतर्गत तब्बल 1.1 कोटी लोकांना घरापर्यंत पाण्याचं कनेक्शन मिळालं आहे तर 85 लाख सीवर कनेक्शन जोडण्यात आले आहेत. यामुळे तब्बल 4 कोटी लोकांना फायदा झाला आहे.

हेही वाचा:

भाजपातही जाणार नाही, कॅप्टन नवीन टीम तयार करणार?; पंजाब निवडणुकीत अमरिंदर सिंगांचा ‘खेला होबे’?

ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंहांकडून संघ आणि भाजपचं कौतुक, नर्मदा यात्रेतल्या सहकार्याबद्दल अमित शाहांचे आभार

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.