पंतप्रधानांचे ‘विकास’कारण: काशी विश्वनाथ धाम नंतर सर्वाधिक लांबीच्या गंगा एक्स्प्रेस-वेचं भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशवर विशेष लक्ष केंद्रित आले आहे. पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी काशी विश्वनाथ धामाच्या लोकार्पणानंतर देशातील सर्वात मोठ्या एक्स्प्रेस-वेचे भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 18 डिसेंबरला गंगा एक्स्प्रेस-वे भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे.
नवी दिल्ली : उत्तरप्रदेश निवडणुकीचा (Uttar Pradesh Election) रणसंग्राम काही महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उत्तर प्रदेशवर विशेष लक्ष केंद्रित आले आहे. पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी काशी विश्वनाथ धामाच्या लोकार्पणानंतर देशातील सर्वात मोठ्या एक्स्प्रेस-वेचे भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 18 डिसेंबरला गंगा एक्स्प्रेस-वे भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. गंगा एक्स्प्रेस-वे हा देशातील सर्वाधिक लांबीचा मार्ग ठरण्याची शक्यता आहे. मेरठ ते प्रयागराज विस्तार असलेला महामार्ग विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
PM Modi to lay the foundation stone of 594 km long Ganga Expressway in Shahjahanpur, UP on 18 Dec. The Expressway will be built at a cost of over Rs 36,200 cr. 3.5km long airstrip for assisting emergency take-off and landing of IAF planes to be constructed on the Expressway: PMO pic.twitter.com/3RWIzvH1ka
— ANI UP (@ANINewsUP) December 16, 2021
गंगा एक्स्प्रेस-वे ची महत्वाची उद्दिष्टे दृष्टिक्षात :
- उत्तर प्रदेशच्या विविध जिल्हे आणि खेड्यांना गंगा एक्स्प्रेस-वे द्वारे जोडले जाणार आहे.
- उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूर येथे 18 डिसेंबरला भूमिपूजनाचा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.
- मेरठ ते प्रयागराज असा महामार्गाचा विस्तार असणार आहे.
- तब्बल 600 किलोमीटर लांबीचा गंगा एक्स्प्रेस-वे भारतातील सर्वात मोठा महामार्ग ठरण्याची शक्यता आहे.
- गंगा एक्स्प्रेस-वे मुळे प्रयागराजवरुन दिल्ली केवळ दोन तासांत गाठता येणार आहे.
- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन निर्मित गंगा एक्स्प्रेस-वे आठ लेनचा असणार आहे
- पहिल्या टप्प्यात सहा लेनचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
- गंगा एक्स्प्रेस-वे निर्मिती जबाबदारी अदानी ग्रूप आणि आयआरबीकडे सोपविण्यात आली आहे.
- महत्वाकांक्षी प्रकल्पाचा निर्मिती खर्च अंदाजित 36,200 कोटी रुपये असणार आहे.
- गंगा एक्स्प्रेस-वे साठी 96 टक्के जमीनींचे भू-संपादन पूर्ण करण्यात आले आहे.
- गंगा एक्स्प्रेस-वे मार्गावरील प्रमुख शहरे- मेरठ, ज्योतिबा फुले नगर, बुलंदशहर, अमरोहा, शाहजहांपूर, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड, प्रयागराज
- गंगा एक्स्प्रेस-वे वर औद्योगिक क्लस्टरची निर्मिती केली जाणार आहे.
- गंगा एक्स्प्रेस-वे वर शाहजहांपुर नजीक आपत्कालीन विमानाच्या लँडिंगसाठी हवाई धावपट्टी उभारण्यात येईल.
- गंगा एक्स्प्रेस-वेच्या दुतर्फा औद्योगिक कॉरिडॉर असणार आहे. अंदाजित 20 हजार व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
- गंगा एक्स्प्रेस-वे वर 14 मोठे पुल, 126 छोटे पूल, 7 आरओबी, 28 फ्लायओव्हर आणि 8 डायमंड इंटरचेंज असणार आहे.
- गंगा नदीवर एक किलोमीटर व रामगंगा नदीवर अर्धा किलोमीटर लांबीचा पूल बनविला जाणार आहे.
- संपूर्ण गंगा एक्स्प्रेस-वे च्या मार्गावर मुख्य 2 आणि अन्य 15 टोल बनविले जाणार आहे.
इतर बातम्या :