Kashi Vishwanath Corridor: मुमताज अलीने खास तयार केलेले अंगवस्त्र देऊन मोदींचा सत्कार होणार; पंतप्रधानांच्या स्वागताची जय्यत तयारी
काशी विश्वनाथ धामचं उद्या 13 डिसेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे लोकार्पण पार पडणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.
वाराणासी: काशी विश्वनाथ धामचं उद्या 13 डिसेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे लोकार्पण पार पडणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. यावेळी काशी नगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अनोखं आणि जंगी स्वागत होणार आहे. जीआईचं उत्पादन असलेल्या हस्तशिल्पाने मोदींचं स्वागत केलं जाणार आहे. यावेळी मोदींना मुमताज अलीने खास तयार केलेलं रुद्राक्ष जडीत अंगवस्त्र देण्यात येणार आहे. त्याशिवाय त्रिशूळ आणि कमळावर विराजमान झालेलं शिवलिंगही मोदींना देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते पंतप्रधा नरेंद्र मोदी यांना या वस्तू भेट म्हणून देण्यात येणार आहेत. या उत्पादनाला अंतिम रुप देण्यासाठी हस्तशिल्पकार कामाला लागले आहेत. काशीपुराचे विजय केसरा, रमेश आणि राज्य पुरस्कार विजेते अनिल कसेरा यांनी तीन फूट आणि सहा इंच मेटल रिपोजी क्राफ्टचा त्रिशूळ तयार केला आहे. या त्रिशूळात चार नागांची आकृती रेखाटण्यात आली आहे. तर लल्लापुरा येथील रहिवासी मुमताज अली यांनी जरी-जरदोजी आणि रेशमचा प्रयोग करून पंचमुखी रुद्राक्षाचे 24 दाने लावून एक अंगवस्त्र तयार केलं आहे. ते सुद्धा मोदींना देण्यात येणार आहे.
15-25 दिवसात वस्तू तयार केल्या
रामकटोरा येथे राहणारे चंद्रप्रकाश विश्वकर्मा यांनी 22 इंचाच्या आकृतीत कमळाच्या कळ्यांमध्ये शिवलिंग बसवलं आहे. या शिवलिंगाचं वैशिष्ट्ये म्हणजे कळ्यांमध्ये असलेल्या बटनाला दाबल्यानंतर ते उघडते आणि बंद होते.
या सर्व वस्तू तयार करण्यासाठी 15 ते 25 दिवस लागले. ही उत्पादने आजच प्रशासनाला सोपविली आहेत, असं जीआईचे डॉ. रजनीकांत यांनी सांगितलं. उद्या काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. तब्बल तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात घाटांवर देव दिवाळीप्रमाणे दिवे लावले जाणार आहेत. लेजर लाईट शोचंही आयोजन करण्यात आलं आहे. सर्व मंदिरं, सरकारी आणि खासगी इमारतींवरही विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे.
4 हजार लोकांची व्यवस्था
काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनानिमित्त वाराणसी व्यतिरिक्त देश-विदेशातील विद्वान आणि ऋषी-मुनींना पाचारण करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी येणाऱ्या तब्बल चार हजार लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण वाहिन्यांशिवाय धार्मिक स्थळे, चौकाचौकात टीव्ही स्क्रीनवरून केले जाणार आहे. त्यामुळे ज्यांना घटनास्थळी पोहोचता येत नाही. त्यांनाही या भव्य कार्यक्रमाचा भाग होता येणार आहे. या ऐतिहासिक क्षणात सहभागी होण्यासाठी आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी जगभरातील शिवभक्त काशीला पोहोचत आहेत. त्यामुळे या भाविकांनी काशीचे रस्ते गजबजले आहेत, हॉटेलात पाय ठेवायलाही जागा नाही. पर्यटन उद्योग व इतर व्यवसायात चार नव्हे तर हजार चाँद लागले आहेत.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 December 2021 pic.twitter.com/GkzmEpizpv
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 12, 2021
संबंधित बातम्या:
Jaipur Rally: हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून घालवा, हिंदूंची सत्ता आणा; राहुल गांधींची हिंदूंना साद
बिन लग्नाचं राहू नका, जे राहिले त्यांनी देश वेठीस धरला; ओवेसींचा जोरदार हल्ला