PM Modi Bihar Visit : पीएम मोदी 24 एप्रिल रोजी मधुबनीला जाणार, बिहारसाठी खास आहे दिवस
ग्रामपंचायत स्तरावर राष्ट्रीय पंचायती राज दिनाचे आयोजन होण्याची ही पहिलीच वेळ आहे, ज्यामध्ये पंतप्रधान स्वतः सहभागी होत आहेत असे मंत्रालयाने म्हटले आहे.

बिहारला क्लायमेट एक्शन स्पेशलच्या श्रेणीत तिसरा क्रमांक मिळाला आहे. २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत दिवसाच्या मुहूर्तावर बिहारमध्ये आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी विजेत्यांचा सत्कार करणार आहे. यंदाचा राष्ट्रीय पंचायतीराज दिवस बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील लोहना उत्तर ग्रामपंचायतीमध्ये आयोजित केला आहे. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून मोदी उपस्थित राहणार आहेत.
गावांच्या विकासासाठी पंचायतींमध्ये निरोगी स्पर्धा वाढवण्यासाठी केंद्र सरकार दरवर्षी राष्ट्रीय पंचायत पुरस्काराचे आयजन करीते. यावेळी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये तीन विशेष श्रेणींचे पुरस्कार देखील दिले जातील. महाराष्ट्र, तेलंगणा आणि केरळ यांनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे, तर उत्तर भारतातून केवळ बिहारलाच आपले स्थान निर्माण करता आले आहे.
ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळणार
या समारंभात विशेष श्रेणीतील राष्ट्रीय पंचायत पुरस्कार देखील दिले जाणार आहेत. पहिल्यांदाच, पंचायती राज मंत्रालयाने स्वतःच्या स्रोत महसूल (OSR) मध्ये वाढ करून स्वावलंबी बनलेल्या ग्रामपंचायतींना आणि हवामान संवेदनशील ग्रामपंचायतींना ( हवामान कृती ) आणि ग्रामपंचायतींच्या क्षमता बांधणीसाठी सर्वोत्तम संस्था पुरस्कारासाठी विशेष पुरस्कार सुरू केले आहेत. पंचायती राज मंत्रालयाने तज्ञांनी ठरवलेल्या मानकांच्या आधारे विजेत्यांची निवड केली आहे. तिन्ही श्रेणीतील पहिल्या विजेत्यांना १ कोटी रुपये, दुसऱ्या विजेत्याला ७५ लाख रुपये आणि तिसऱ्या विजेत्याला ५० लाख रुपये आणि विशेष ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.