PM मोदी महाराष्ट्राला देणार मोठी भेट, भारतातील सर्वात लांब अटल सेतूचे करणार उद्घाटन

PM Modi maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पीएम मोदी महाराष्ट्राला अनेक मोठ्या भेट देणार आहेत. येथे 30,500 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहे. यावेळी ते मुंबई ते नवी मुंबई या अटल पुलाचे देखील उद्घाटन करणार आहेत.

PM मोदी महाराष्ट्राला देणार मोठी भेट, भारतातील सर्वात लांब अटल सेतूचे करणार उद्घाटन
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 4:37 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी 30,500 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांना ते हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडचं ही उद्घाटन करणार आहेत. ज्याला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. देशातील हा सर्वात मोठा सागरी सेतू असणार आहे. अटल सेतू हा मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा देशातील सर्वात मोठा पूल आहे.

भारतातील सर्वात लांब पूल

अटल सेतूची लांबी 21.8 किलोमीटर इतकी आहे. या पुलावर एकूण सहा लेन असणार आहेत. अटल सेतूच्या बांधकामासाठी सुमारे 17,840 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. 7 वर्षानंतर अटल सेतू पूर्णपणे तयार झाला असून त्याचा लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. अटल सेतूमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईचं अंतर जलद पूर्ण होणार आहे.

काय होणार फायदा

अटल सेतूमुळे केवळ इंधनच वाचणार नाही तर वेळही वाचणार आहे. मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी लागणारा वेळही कमी होणार आहे. अटल पुलामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील संपर्कातही सुधारणा होणार आहे. अटल सेतू राष्ट्राला समर्पित केल्यानंतर पंतप्रधान मोदी मुंबईहून नवी मुंबईला जाण्यासाठी या पुलावरून प्रवास करतील.

या पुलामुळे जेथे दोन तास लागत होते. त्या प्रवासाला आता फक्त २० मिनिटे लागणार आहेत. वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सूटका होणार आहे. या पुलावर वेग मर्यादा १०० किमी प्रतितास ठेवण्यात आली आहे. या पुलावरुन मोटारसायकल, ऑटोरिक्षा आणि ट्रॅक्टर यांना प्रवास करता येणार नाहीये.

महाराष्ट्र दौऱ्यात पंतप्रधान मोदी २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचेही उद्घाटन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी 12,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.