TV9 च्या WITT समीटमधील PM मोदी यांचे भाषण, अबू धाबीत बसून ऐकत होते Lulu ग्रुपचे मालक
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 28 मार्च रोजी झालेल्या टीव्ही 9 च्या WITT परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले. टीव्ही 9 नेटवर्कच्या व्यासपीठावरील त्यांचे भाषण केवळ देशातच नाही तर परदेशातही ऐकले गेले. अबू धाबी येथील उद्योगपती युसूफ अली आणि त्यांच्या टीमनेही पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी खास व्यवस्था केली होती.

टीव्ही 9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ कॉनक्लेव्हच्या तिसऱ्या आवृत्तीचे नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे शानदार सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कॉनक्लेव्हची सुरुवात झाली आहे. अशा प्रकारच्या समिट एरव्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये भरत असतात. परंतू टीव्ही 9 नेटवर्कने हा पायंडा मोडला आहे याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कचे कौतूक केले आहे. आता अन्य मीडिया देखील या पावलावर पाऊल ठेवून अशा प्रकारच्या समिट भरवतील अशा शब्दा मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पीएम मोदी म्हणाले की तुमच्या नेटवर्कचे ग्लोबल प्रेक्षक झाले आहेत. अनेक देशांतून भारतीय लोक या समिटला पाहत आहेत.
टीव्ही 9 नेटवर्कच्या समीटचे प्रक्षेपण अबु धाबीत होत होते. यावेळी लुलु ग्रुपचे चेअरमन युसूफ यांच्या कंपनीत पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी खास व्यवस्था केली होती.
Witt Lulu Chairman पीएम मोदी यांचे भाषण ऐकताना उद्योजक मंडळी
टीव्ही 9 न्यूज नेटवर्क पाहण्यासाठी पीएम मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी Lulu ग्रुपने अबू धाबीमध्ये विशेष व्यवस्था केली आहे. Lulu ग्रुपचे मालक यूसुफ अली आणि त्यांच्या टीमने पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन लक्षपूर्वक ऐकले.
पीएम मोदी यांचे भाषण ऐकताना उद्योजक मंडळी
PM Modi’s speech, Lulu Group owner Yusuf Ali sitting together in Abu Dhabi
भारतात युसुफ अली यांची भारतात गुंतवणूक
लुलु ग्रुप इंटरनॅशनल भारताच्या अन्न प्रक्रिया उद्योगात आणि रिटेल उद्योगात गुंतवणूक केली आहे. अबू धाबीत बहुराष्ट्रीय ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एमए युसुफ अली यांनी 2019 मध्ये 5000 कोटी रुपयांची गुंतवणूकासाठी तयार झाले होते.
लुलु मॉल उघडण्याची तयारी
पीएम मोदी यांच्या सोबत त्यांच्या झालेल्या बैठकीत एमए युसुफ अली यांनी भारताच्या अनेक शहरात लुलु मॉल उघडण्याची तयारी केली होती. 2022 मध्ये त्यांनी लखनऊमध्ये लुलु मॉलचे उद्घाटन केले होते. लुलु मॉल केरळातील कोच्ची, तिलुवंतपुरम, त्रिशूर, आंध्रप्रदेशच्या हैदराबादमध्ये देखील आहे. याशिवाय भारताच्या अनेक शहरात असे मॉल उघडण्याची तयारी त्यांनी केली आहे.
Witt Lulu Mall
WITT समिटच्या वेळी लुलु ग्रुप चेअरमन आणि त्याची टीम
कोण आहेत युसूफ अली?
यूसुफ अली मुसलिअम वेट्टिल अब्दुल कादर युसूफ हे भारतीय व्यापारी आणि अब्जाधीश आहेत. ते लुलु ग्रुप इंटरनॅशनलचे चेअरमन देखील आहेत. जगभरात लुलु हायपरमार्केट सिरीज आणि लुलु इंटरनॅशनल शॉपिंग मॉल आहेत. यांचा व्यापार जगातील 22 देशात पसरला आहे.
यूसुफ अली यांच्या कंपनीत मोठ्या संख्येने एनआरआय मंडळी काम करतात. फोर्ब्स मिड ईस्टच्या मते युसूफ अली यांनी अरब वर्ल्ड 2018 मध्ये टॉप 100 भारतीय उद्योगकांमध्ये नंबर एकची रँक मिळाली होती. ऑक्टोबर 2023 मध्ये प्रकाशित फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार 6.9 अब्ज डॉलर संपत्तीमुळे त्यांचे स्थान 27 व्या सर्वात श्रीमंत भारतीयांत त्यांचे नाव आले होते.