ड्रेसिंग सेन्स ते धडाधड निर्णय, विश्वगुरू, द बॉस… कशी आहे नरेंद्र मोदी यांची 73 व्या वर्षापर्यंतची घौडदौड?
PM Narendra Modi 74th Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. तिसऱ्यांदा ते देशाचे पंतप्रधान झाले आहे. ड्रेसिंग सेन्स ते धडाधड निर्णय, विश्वगुरू, द बॉस... कशी आहे नरेंद्र मोदी यांची 73 व्या वर्षापर्यंतची घौडदौड?
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप देशभरात पंधरवाडा साजरा करत आहे. स्वतंत्र भारतात जन्म घेतलेल्या पंतप्रधानांची छबी ही ऊर्जावान, सेवादार, दूरदर्शी आणि दृढनिश्चय अशी आहे. त्यांनी तिसऱ्यांदा देशाची कमान सांभाळली आहे. ड्रेसिंग सेन्स ते धडाधड निर्णय, विश्वगुरू, द बॉस… कशी आहे नरेंद्र मोदी यांची 73 व्या वर्षापर्यंतची घौडदौड?
15 वर्षांपूर्वी देशाची हाती कमान
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे 14 वे पंतप्रधान आहेत. 26 मे 20214 रोजी ते पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांनी सलग तिसऱ्यांदा PM पदाची शपथ घेतली. सलग 15 वर्षे त्यांनी काँग्रेसला केंद्रात रोखले आहे. यावेळी त्यांनी NDA मधील सहकाऱ्यांच्या मदतीने सरकार तयार केले.
जन्म, लग्न आणि नंतर…
नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर येथे एका गुजराती कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव हिराबेन आणि वडिलांचे नाव दामोदरदास मूलचंद मोदी असे होते. वडिलांचा चहा विक्रीचा व्यवसाय होते. ते लहानपणापासून वडिलांना मदत करत होते. काही दिवस त्यांनी चहाचा स्टॉल चालवला. त्यांचे शिक्षण वडनगर येथेच झाले. त्यांनी घर सोडले आणि ते भारत भ्रमणासाठी बाहेर पडले. घरी परतल्यावर 1968 मध्ये जशोदाबेन यांच्याशी त्यांचे लग्न झाले. पण दोघेही काही दिवसानंतर विभक्त झाले.
8 व्या वर्षी ते RSS च्या संपर्कात आले
मोदी जेव्हा 8 वर्षांचे होते, त्यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) संपर्कात आले. या संघटनेच्या विचाराच्या ते प्रभावाखाली आले. त्यांनी 20 व्या वर्षीच आरएसएस प्रचारक म्हणून कामाला सुरूवात केली. या संघटनेत त्यांनी दीर्घ काळ काम केले. त्यानंतर ते भाजपात दाखल झाले. त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. लहानपणी त्यांचा भारतीय लष्कराकडे ओढा होता.
7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर सलग 13 वर्षे ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत विराजमान होते. त्यांनी केंद्राच्या राजकारणात उडी घेतली. 2014 मध्ये वाराणसी येथून त्यांनी निवडणूक जिंकली आणि ते देशाचे 14 वे पंतप्रधान झाले. त्यांनतर सलग तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले. त्यांच्या व्यक्तित्वाचा जगातही मोठा प्रभाव पडला. अमेरिकेपासून ते ऑस्ट्रेलिया आणि रशियापासून ते दक्षिण कोरियापर्यंत त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. भारतीय परराष्ट्र धोरणात ते आल्यापासून मोठा बदल झाला आहे. अलिप्ततावादी धोरणासोबतच त्यांनी आक्रमक परकीय धोरणाचा परिचय दिला आहे. त्यांच्या मोदी जॅकेटची तर जगभरात हवा झाली आहे. त्यासोबतच भारताची कणखर भूमिका पण अनेकदा समोर आली आहे. कोणत्याही राष्ट्राला न जुमानता भारत त्याची भूमिका स्पष्ट पण आंतरराष्ट्रीय मंचावर मांडत आहे. त्यांच्या अनेक योजनांची दखल इतर राष्ट्रांनी सुद्धा घेतली आहे.