PM Modi Speech : बांग्लादेशातील हिंदू, संविधान, समान नागरी कायदा, याबद्दल पीएम मोदींच महत्त्वाच भाष्य
PM Modi 78th independence day Speech :“भारत बेस्ट क्वालिटीसाठी ओळखला गेला पाहिजे. विश्वासाठी डिझायनिंग इंडियावर भर द्यायचा आहे. इंडियन स्टँडर्ड आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड बनलं पाहिजे. ते उत्पादनाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे, क्वालिटीवर भर द्यावा लागेल. डिझायनिंग क्षेत्रात बरच काही नवीन देऊ शकतो. आज गेमिंगच खूप मोठ मार्केट आहे. आजही गेमिंगवर प्रभाव विदेशी कमाई होते" असं पीएम मोदी म्हणाले.
भारताचा आज 78 वा स्वातंत्र्य दिन आहे. लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी अनेक महत्त्वाच्या विषयावर पंतप्रधान मोदी बोलले. यात युनिफॉर्म सिविल कोड, संविधान आणि बांग्लादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल पीएम मोदी बोलले. “सुप्रीम कोर्टाने अनेकदा युनिफॉर्म सिविल कोडवर चर्चा केली आहे. आदेश दिले आहेत. आपण जे सिविल कोड घेऊन जगतोय, ते खरंतर कम्युनल सिविल कोड आहे. भेदभाव करणारं सिविल कोड आहे. संविधानाची भावना जे सांगतेय, सुप्रीम कोर्ट जे सांगतय, संविधान निर्मात्यांच स्वप्न पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे. या गंभीर विषयावर देशात व्यापक चर्चा झाली पाहिजे. प्रत्येकाने विचार मांडले पाहिजेत. जे कायदे धर्माच्या आधारावर देशाच विभाजन करतात, उच, नीच करतात अशा कायद्यांना आधुनिक समाजात स्थान नाही. युनिफॉर्म सिविल कोडमध्ये 75 वर्ष घालवली. आता सेक्युलर सिविल कोडच्या दिशेने गेलं पाहिजे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“आपल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. देशाला एक बनवणं, श्रेष्ठ बनवणं, लोकशाहीला मजबूत करणं, यात देशाच्या संविधानाची महत्त्वाची भूमिका आहे. दलित, शोषित, वंचित यांना सुरक्षा देण्याच काम संविधानाने केलय. संविधानाची 75 वर्ष साजरी करताना संविधानाने सांगितलेल्या कर्तव्य भावनेवर भर दिला पाहिजे. 140 कोटी देशवासियांबरोबर केंद्र सरकार, राज्य सरकार सर्वांनीच कर्तव्य बजावलं पाहिजे. सर्व मिळून कर्तव्याच निर्वाहन करु, तेव्हा अधिकारांची रक्षा होते. लोकशाही मजबूत होईल, सामर्थ्य वाढेल, नव्या शक्तीने पुढे जाऊ” असं पीएम मोदी म्हणाले.
“A Golden era for India” says PM Modi, highlights transformation in Defence sector and Toy manufacturing
Read @ANI Story | https://t.co/MtiaZ9tS3k #IndependenceDay2024 #Defencesector #PMModi pic.twitter.com/yvq6sFhS4m
— ANI Digital (@ani_digital) August 15, 2024
बांग्लादेशबद्दल पीएम मोदी काय म्हणाले?
“बांग्लादेशात जे काही झालय. त्याबद्दल चिंता आहे. मी आशा करतो, तिथे परिस्थिती सामान्य होईल. खासकरुन 140 कोटी देशवासियांना चिंता आहे. बांग्लादेशात हिंदू, अल्पसंख्याक समुदायाची सुरक्षा सुनिश्चित झाली पाहिजे. शेजारी देशात सुख, शांती नांदावी हीच नेहमी भारताची भूमिका राहिली आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचे तसे संस्कार आहोत. बांग्लादेशाच्या विकास यात्रेत आमचं शुभचिंतन राहील” असं पीएम मोदी म्हणाले.