प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या गडबडीतही पंतप्रधानांनी बिग बींना इशाऱ्यात काय विचारलं? बिग बींनीही दिलं उत्तर
बिग बी अमिताभ बच्चन यांनी अलिकडेच अयोध्येत जमीन खरेदी केली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला बॉलीवूडचं अख्खं तारकामंडळ अवतरलं होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्याच्या गडबडीतही बॅरिकेट्सच्या आडून बिग बी अमिताभ बच्चन यांना खुणेनेच काही तरी विचारले....
अयोध्या | 22 जानेवारी 2024 : राम मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा अयोध्येत संपन्न झाला. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला अनेक पाहुणे आले होते. या सोहळ्यात अनेक उद्योजग आणि चित्रपट तारे देखील आले होते. या सोहळ्याला जवळपास सात हजार नामीगिरामी हस्ती हजर होत्या. सोहळ्यानंतर जनतेला अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी हितगुज केली. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या इतक्या घाईगडबडीतही पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवाद साधला. अमिताम बच्चन यांनी देखील पंतप्रधानांना नमस्कार करीत बातचीत केली. काय नेमकी या उभयंतात हितगुज झाली यासंबंधीचा सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल होत आहे.
राम मंदिराचे भव्य दिव्य स्वरुपात लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्याला सात हजार मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते. या सोहळ्यास उद्योज जगत आणि बॉलिवूडची अनेक मंडळी उपस्थित होती. या मंडळींमध्ये बिग बी अमिताभ देखील अभिषेक बच्चन यांच्यासह उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोहळा झाल्यानंतर उपस्थितांना अभिवादन केले. त्यावेळी गर्दीत उभ्या असलेल्या अमिताभ बच्चन यांना नमस्कार केला. अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधानांना नमस्कार केला. तेव्हा दोघांमध्ये संवाद झाला. पंतप्रधानांनी हाताकडे खूण करीत काय झाले होते असे विचारले. बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील पंतप्रधानांना होता है…असे उत्तर दिले. त्यामुळे उपस्थितांना या उभयंतात नेमकी काय ? चर्चा झाली असा प्रश्न पडला.
होता रहता है !
बिग बी अमिताभ बच्चन यांना केबीसीचे सूत्रसंचालक म्हणून काम करताना हाताला दुखापत झाली होती. त्यांच्या हाताला प्लास्टरही करण्यात आले होते. समाज माध्यमावर बिग बींनी याबद्दल पोस्ट केली होती.या दुखापतीबद्दल पंतप्रधानांनी खुणेनेच बॅरिकेट्समधूनही बिग बींची विचारपूस केली. त्यास बिग बींनी होता है…असे उत्तर दिले.