PM Modi Birthday | ‘मोदी आहेत तर सर्वकाही शक्य आहे…’, हजरत निजामुद्दीन दर्ग्यात पंतप्रधान मोदींसाठी प्रार्थना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त आज दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्गा याठिकाणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगात देशाला उच्च स्तरावर पोहोचवलं आहे. २०२४ मध्ये देखील पंतप्रधान मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी आमची प्रार्थना आहे... असं देखील मुस्लिम बंधाव म्हणाले.

PM Modi Birthday | 'मोदी आहेत तर सर्वकाही शक्य आहे...', हजरत निजामुद्दीन दर्ग्यात पंतप्रधान मोदींसाठी प्रार्थना
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 9:02 PM

मुंबई : 17 सप्टेंबर 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. मोदी यांचा वाढदिवस असल्यामुळे अनेक जण त्यांना शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मोदी यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. एवढंच नाही तर, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. राजधानी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्ग्यात आज मुस्लिम समाजाच्या बांधवांनी सामूहिक प्रार्थना कार्यक्रमाचे आयोजन केले आणि पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

हजरत निजामुद्दीन दर्ग्यात नमाज अदा करणाऱ्या मुस्लिम बाधवांनीनी ‘टीव्ही 9 भारतवर्षा’शी केलेल्या खास संवादात सांगितले की, आज केवळ देशाच्याच नाही तर जगालाही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे त्यांनी 2024 मध्येही पंतप्रधान व्हावे अशी आमची इच्छा आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाची चर्चा आहे.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त हजरत निजामुद्दीन दर्ग्या लोकांनी आपापसात लाडूही वाटले. यावेळी कव्वाली गाऊन पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आलेले मुस्लिम बांधव म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच वेळी सर्वांचा विचार करतात आणि सर्वाना सोबत घेवून यशाची पायरी चढतात. त्यामुळे सर्व धर्माच्या लोकांना मोदी यांच्यावर विश्वास आहे…’

हजरत निजामुद्दीन दर्गा येथे बांधवांनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या नाहीत तर, चांद्रयान 3 मोहिमेबद्दल आणि दिल्लीतील G-20 च्या यशस्वी संस्थेबद्दल देखील मोदी यांचं कौतक केलं. सोहळ्या दरम्यान, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी देखील दर्ग्यात पोहोचले.

‘टीव्ही 9 भारतवर्षा’शी बोलताना जमाल सिद्दीकी म्हणाले, ‘मुस्लिम धर्माचं हित पंतप्रधान नरेंद्र मोदी समजू शकतात, हे आता मुस्लिम समाजातील लोकांना कळलं आहे. बाकीचे विरोधक केवळ दिशाभूल करण्याचे काम करतात.’ असं देखील जमाल सिद्दीकी म्हणाले.

सध्या सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाची चर्चा रंगत आहे. देशातील अनेकांनी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक सेलिब्रिटींनी देखील नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.