क्रिएटिव्हिटी का दुसरा नाम नरेंद्र मोदी!, जाणून घ्या मोदींच्या विजयाच्या क्लुप्त्या…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्यांनी ज्या प्रचार तंत्रांचा वापर करत निवडणुका जिंकल्या त्याचा आढावा घेऊयात...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 72 वा वाढदिवस (PM Narendra Modi Birthday) आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. नामीबियामधून आठ चित्ते आज भारतात आणले गेले आहेत. यात पाच मादी तर चार नर आहेत. याशिवाय देशभर विविध उपक्रम राबण्यात येत आहेत. राज्यातही स्वच्छता मोहिम राबवली जातेय. पंतप्रधानांच्या (Narendra Modi) वाढदिवसानिमित्त त्यांच्या विविध कौशल्यांवर प्रकाश टाकला जातोय. त्यातील निवडणूक प्रचार हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कारण त्याच्या आधारेच ते सर्वसामान्य नरेंद्र मोदी ते देशाचे पंतप्रधान व्हाया गुजरातचे मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास करु शकले. त्यांनी विविध प्रचारतंत्र वापरली. आधुनिक साधणं आणि लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी आपल्या भाषणात मांडले. त्याचमुळे तरुणाईमध्ये त्यांची क्रेझ वाढत गेली. त्यांनी ज्या प्रचार तंत्रांचा वापर करत निवडणुका जिंकल्या त्याचा आढावा घेऊयात…
भारतीय राजकारणात नरेंद्र मोदी हे नाव रुढ झाल्यानंतर राजकीय प्रचार आणि निवडणूक प्रचाराच्या पद्धतीमध्ये बदल झाला. इतर पक्षांपेक्षा भाजप आणि विशेषत: नरेंद्र मोदी वेगळ्या पद्धतीने प्रचारतंत्र वापरतात.
नवी निवडणूक नवा मुद्दा
प्रत्येक निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर लढणं ही पंतप्रधान मोदींची खासियत आहे. ते मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये तीन विधानसभा निवडणुका लढल्या गेल्या . मोदींनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर तीन वेळा निवडणूक लढवली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विकासाचा मुद्दा पुढे केला. ‘सबका साथ सबका विकास’चा नारा दिला. तर 2019 मध्ये ‘मोदी है तो मुमकीन है’ ही घोषणा लोकप्रिय झाली.
सोशल मीडियाचा प्रभावी वापर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला . ते सोशल मीडियाची ताकद जाणून होते. तंत्रज्ञानाच्या निवडणुकीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात काँग्रेस पुढाकार घेत होती . पण नरेंद्र मोदींना सोशल मीडियाची ताकद आणि महत्त्व कळालं आणि त्यांनी त्याचा प्रभावी वापर केला.
मोबाईलचा योग्य वापर
जगभरात झालेल्या माहिती क्रांतीनंतर प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला. मोबाईल हे संपर्काचं सोपं साधन झालं. या मोबाईलचाही मोदींनी आपल्या प्रचारासाठी वापर केला. त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारासाठी अॅपचाही वापर केला. 2014 मध्ये त्यांनी ‘इंडिया 272’ नावाचं अॅप तयार केलं. त्याआधारे त्यांनी प्रचार केला.
थ्रीजी टेक्नॉलॉजीचा वापर
नरेंद्र मोदी यांनी प्रचारात सर्वप्रथम थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत याची खूप चर्चा झाली होती. पण नरेंद्र मोदींनी 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा त्याचा वापर केला. 20 नोव्हेंबर 2012 रोजी मोदींनी 3D तंत्रज्ञानाने एकाच वेळी चार शहरांमध्ये रॅली काढली होती.