आम्ही कुणावर अवलंबून नाही, भारताच्या दोन्ही लसीचं पंतप्रधानांकडून कौतुक

अजून काही लस आपल्याकडे येतील. त्यानंतर आपल्याला त्याचाही फायदा होईल," असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.  (PM Narendra Modi On Made In India Corona Vaccine) 

आम्ही कुणावर अवलंबून नाही, भारताच्या दोन्ही लसीचं पंतप्रधानांकडून कौतुक
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 6:02 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात कोरोना लसीकरणाचा अभियान कशाप्रकारे राबवलं जाईल, याची माहिती दिली. “विशेष म्हणजे भारताने निर्मित केलेल्या दोन्ही  कोरोना लस स्वस्त आहे. जर आपल्याला लसीसाठी इतर देशांवर अवलंबून राहावं लागलं असतं, तर काय परिस्थिती असती, याचा तुम्ही विचार करु शकतो,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  (PM Narendra Modi On Made In India Corona Vaccine)

“आपण एका निर्णयाक टप्प्यात प्रवेश करत आहोत. येत्या 16 जानेवारीपासून आपण सर्वात मोठं लसीकरण अभियान सुरु करत आहोत. ही अभिमानाची बाब आहे. ज्या दोन कोरोना लसींना आप्त्कालीन परवानगी दिली आहे. त्या दोन्ही लस मेड इन इंडिया आहेत. इतकंच नव्हे तर अजून चार कोरोना लस विकसित होत आहेत. काही महिन्यांनी अजून काही लस आपल्याकडे येतील. त्यानंतर आपल्याला त्याचाही फायदा होईल,” असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

आपल्या दोन्ही कोरोना लस इतर लसींपेक्षा स्वस्त

“कोरोना लसीचा जो काही निर्णय आहे, तो शास्त्रज्ञांनी घेतला पाहिजे. त्याव्यतिरिक्त आपण काहीही करायचं नाही, हे मी आधीच बजावले होते. आपल्या या दोन्ही कोरोना लस जगातील इतर लसीपेक्षा स्वस्त आहेत. जर भारताला लसीसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागले असते तर काय परिस्थिती आली असती याचा आपण विचार करु शकतो. त्यामुळे ही लस भारताची परिस्थिती बघून निर्मित करण्यात आली आहे,” असेही मोदी म्हणाले.

“कोरोनाच्या संकटकाळात आपण एकत्र होऊन त्यावर मात केली. यादरम्यान संवेदनशीलसोबत काही निर्णयही घेण्यात आले. भारतात कोरोनाचे संक्रमण हे इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. देशात 7-8 महिन्यांपूर्वी चिंता आणि भितीचे वातावरण होते, त्यातून आता लोक बाहेर पडले आहेत. मात्र पूर्णपणे निष्काळजी असल्यासारखे वागू नका,” असे आवाहन मोदींनी केले आहे.

कोरोना लसीकरणासाठी अॅपची निर्मिती 

कोरोना लसीकरणासाठी कोव्हिन नावाचे डिजीटल अॅप बनवण्यात आले आहे. आधार कार्डद्वारे याची नोंदणी केली जाणार आहे. कोरोनाची लस मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा त्या व्यक्तीला लस कधी दिली जाईल, याचीही यात माहिती असणार आहे. कोव्हिन अॅपवर तातडीने प्रमाणपत्र मिळेल. त्यावरुन कोणाला लस मिळेल, हे समजेल. भारत जे करणार आहे, ते इतर देश फॉलो करतील, त्यामुळे आपली जबाबदारी महत्त्वाची आहे, असेही मोदींनी सांगितले. (PM Narendra Modi On Made In India Corona Vaccine)

संबंधित बातम्या : 

कोरोना लसीच्या वाहतुकीसाठी पुण्यात खास ट्रक्स; उद्या पहाटे लसीची पहिली खेप होणार रवाना?

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू; कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.