Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींचा 25 वर्षांचा प्लॅन तयार, आतापर्यंतचा विकास फक्त ट्रेलर, आगामी काळात मोठी स्वप्न पूर्ण होणार, पंतप्रधानांचा दावा

"माझ्या मनात खूप मोठमोठे प्लॅन आहेत. कुणालाही घाबरण्याची गरज नाही. माझे निर्णय कुणाला घाबरवणारे नाहीत किंवा कुणावर दबाव आणणारेही नाहीत. माझे निर्णय देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. जनकल्याणासाठी आहे", असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदींचा 25 वर्षांचा प्लॅन तयार, आतापर्यंतचा विकास फक्त ट्रेलर, आगामी काळात मोठी स्वप्न पूर्ण होणार, पंतप्रधानांचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 6:26 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डीडी न्यूज’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. या मुलाखतीत त्यांनी आपला देशाच्या विकासासाठी पुढच्या 25 वर्षांचा प्लॅन तयार आहे. आतापर्यंत झालेला विकास हा केवळ ट्रेलर होता. आगामी काळात आणखी महत्त्वाचे निर्णय होणार आहेत, अस मोदींनी सांगितलं. तसेच मतदारांनी 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या 5 ते 6 दशकांचं काम आणि भाजपचं 10 वर्षांचं काम याची तुलना करुन निर्णय घ्यावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. “2047 आणि 2024 यांना मिक्स करता येणार नाही. दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा देश स्वातंत्र्याचं अमृत महोत्सव साजरा करत होता, त्यावेळी हा विषय सर्वांसमोर मांडायला सुरुवात केली होती. बरोबर ठीक दोन वर्षांपूर्वी. 2047 ला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील. स्वाभाविकपणे असे माईलस्टोन आपल्यात नवा उत्साह भरतात, नव्या संकल्पासाठी व्यक्तीला तयार करतात. ही एक संधी आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“75 वर्षांवर आपण उभे आहोत. 100 वर्षांवर पोहोचणार आहोत. या 25 वर्षांचा सर्वांगीण उपयोग कसा करता येईल, प्रत्येक संस्थेत लक्ष्य बनवलं आहे. मी आपल्या गावाचा प्रमुख आहे, मी 2047 पर्यंत आपल्या गावासाठी इतकं काम करेन. आरबीआयच्या कार्यक्रमात मी गेलो होतो. आरबीआयला 90 वर्षे झाली. पुढचे 10 वर्ष फार महत्त्वाचे आहेत. यावर आतापासून विचार करा. 2047 साल हे भारताच्या स्वातंत्र्याचं साल असेल. देशात एक प्रेरणा जागरुक व्हायला हवी. स्वातंत्र्याचे 100 वर्ष ही प्रेरणा आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘काँग्रेसचं पाच-सहा दशकांचं काम हे त्यांच्यासाठी एक मोठं मैदान’

“2024 चा क्रम हा निवडणुकीच्या दृष्टीकोनाने आलेला क्रम आहे. देशाच्या समोर एक संधी आहे. एक काँग्रेस सरकारचं धोरण आणि भाजप सरकारचं धोरण, त्यांचं पाच-सहा दशकांचं काम हे त्यांच्यासाठी एक मोठं मैदान आहे. माझं काम तर फक्त 10 वर्षांचं आहे. कोणत्याही क्षेत्राबद्दल तुलना करा. काही कमी असेल तरी आमच्या प्रयत्नांमध्ये काहीच कमी राहणार नाही”, असं दावा नरेंद्र मोदी यांनी केला.

“मला 10 वर्षांपैकी 2 वर्ष हे कोरोना संकटाला सामोरं जावं लागलं. कोरोनानंतरचा इफेक्टही फार काळ होता. तरीही आज आम्ही वेग, स्केल, सर्वांगीण विकास, सर्वसमावेशक विकास प्रत्येक पॅरामीटरवर काँग्रेसच्या मॉडेल पेक्षा चांगलं आहोत. आम्हाला वेग आणि स्किल वाढवायची आहे. आधीच्या राजकीय संस्कृतीत कुटुंबाला कसं मजबूत करायचं याचा प्रयत्न केला गेला. पण मी देशाला मजबूत करण्याच्या दृष्टीने काम करत राहिलो. माझं सरकार त्या लक्ष्याने काम करत आहे. 2024 हे निवडणुकीचं वर्ष आहे. इथे आम्ही आमच्या कामांचा रेकॉर्ड घेऊन आलो आहोत. ते सुद्धा त्यांनी केलेल्या कामांचा रेकॉर्ड घेऊन येतील”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘आतापर्यंत जे झालं ते ट्रेलर’

“माझ्या मनात खूप मोठमोठे प्लॅन आहेत. कुणालाही घाबरण्याची गरज नाही. माझे निर्णय कुणाला घाबरवणारे नाहीत किंवा कुणावर दबाव आणणारेही नाहीत. माझे निर्णय देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. जनकल्याणासाठी आहे. देशाच्या तरुणांसाठी मी उशिर करु इच्छित नाही. मी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला. योग्य दिशेने काम करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही भरपूर काही आहे, जे मला अजून करायचं आहे. प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न पूर्ण कसं होईल, ते मी पाहतो आहे. आतापर्यंत जे झालं ते ट्रेलर आहे, मी भरपूर काही करु इच्छित आहे”, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

‘मी 100 दिवसांचा प्लॅन करायचो’

“2047 चा विषय आहे, मी मोठा काळ मुख्यमंत्री राहिलेलो आहे, वारंवार निवडणूक, आचारसंहिता, कोणत्याही राज्यात निवडणूक असेल तर माझ्या राज्यातील काही सीनियर अधिकारी दुसऱ्या राज्यात जायचे. मग मला चिंता असायची की, मी सरकार कशी चालवू? कारण देशात अशा निवडणुका होत राहायच्या. त्यामुळे मी त्यावेळीदेखील 100 दिवसांचा प्लॅन करायचो. मी निवडणुकीत जाण्याआधी सुरु केलं होतं”, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली.

“मी गेल्या दोन वर्षांपासून 2047 साठी काम करत आहे. देशभरातील लोकांचं मत मागितलं. मी जवळपास 15 ते 20 लाख नागरिकांचे अभिप्राय ऐकले. मी अधिकाऱ्यांची टीम उभी केली. मी डॉक्यूमेंट रुपाने तयार करत आहे. निवडणुका झाल्यानंतर राज्यांना संबंधित डॉक्यूमेट पाठवल्या जातील. राज्यांना काय वाटतं याचा अभिप्राय घेईन. त्यानंतर मी नीती आयोगात प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन. त्यातून एक अंतिम निर्णय होईल”, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.