PM मोदी यांनी दान केला भूखंड, पाहा कोणाला दिली त्यांनी आपली जागा?
PM narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नावावर असलेली जागा दान केली आहे. पंतप्रधान मोदींनी ही जागा कोणाला दिली आहे. त्या जागेवर आता कसलं बांधकाम होणार आहे. मोदींनी ही जागा का दान केली जाणून घ्या.
PM modi donate land : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला एक भूखंड दान करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे हा भूखंड आहे. त्या जमिनीवर नाद ब्रह्म कला केंद्र बांधले जाणार आहे. ज्यामुळे भविष्यात ते संगीत कलेच्या ज्ञानाचे अनोखे केंद्र बनणार आहे. या केंद्रात एकाच छताखाली भारतीय संगीत कलांचे ज्ञान दिले जाणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी हे केंद्र बनवण्यालाठी आपला भूखंड मनमंदिर फाउंडेशनला दान केलाय. पंतप्रधान मोदी आणि भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांना हा भूखंड मिळाला होता. गांधीनगरच्या सेक्टर-२ मध्ये हा भूखंड आहे. मनमंदिर फाउंडेशनने गांधीनगरच्या सेक्टर-१ मध्ये ‘नाद ब्रह्म’ कला केंद्राचा पायाभरणी समारंभ आयोजित केला होता, ज्यात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. नाद ब्रह्म कला केंद्राची रचनाही अप्रतिम आहे. इमारतीमध्ये वीणा आकाराची जागा देण्यात आली आहे.
इमारतीत 16 मजले
या भूखंडावर 16 मजली नाद ब्रह्म भवन बांधण्यात येणार आहे. ज्यामुळे गांधीनगर हे भारतीय संगीत कला क्षेत्राचे महत्त्वाचे केंद्र बनणार आहे. नाद ब्रह्म कला केंद्रात सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. असे 12 हून अधिक वर्ग असतील जिथे लोक संगीत आणि नृत्य शिकू शकतील. 200 लोकांची क्षमता असलेले एक मोठे थिएटर असेल. असे ५ स्टुडिओ बांधले जातील ज्यात अभ्यासासोबतच सरावही करता येईल. या नाट्यगृह देखील असणार आहे.
आधुनिक लायब्ररी आणि मैदानी संगीत पार्क
दिव्यांगांसाठी देखील विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अत्याधुनिक ग्रंथालय देखील यात असणार आहे. यात एक संग्रहालय असेल ज्यामध्ये संगीताचा इतिहास प्रदर्शित करता येईल. एक मैदानी संगीत पार्क देखील असेल. रेस्टॉरंटशिवाय आर्ट सेंटर कॉम्प्लेक्समध्ये कॅफेटेरियाही असेल. आगामी काळात या संकुलात विविध उपक्रम राबविले जाऊ शकतात. याच उद्देशाने मनमंदिर फाउंडेशनतर्फे सेक्टर-१ मध्ये एक केंद्र उभारले जात आहे, जे संगीत आणि कला उपक्रमांचे अनोखे केंद्र असेल.