लग्न लपवत संबंध प्रस्थापित करणाऱ्यांना मोदी सरकार कठोर शिक्षा देणार

देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महिलांवर बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. विशेष म्हणजे काही नराधम आपली ओळख लपवून, जात लपवून, लग्न लपवून दुसऱ्या महिलेशी प्रेम संबंधाचे नाटक करतात. ते लग्न लपवून दुसऱ्या महिलांशी संबंध प्रस्थापित करतात, महिलांची फसवणूक करतात. अशा नराधमांना आता कठोर शिक्षा देण्यासाठी हालचाली सुरु आहेत.

लग्न लपवत संबंध प्रस्थापित करणाऱ्यांना मोदी सरकार कठोर शिक्षा देणार
मोदी सरकारच्या मोठ्या हालचाली
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 4:16 PM

संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 27 ऑक्टोबर 2023 : देशात महिला अत्याचाराच्या घटनांवर आळा बसावा यासाठी केंद्र सरकारकडून कडक कायदे करण्याबाबतच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सध्या समाजात अनेक घटना बघायला मिळत आहेत. काही पुरुष पत्नीपासून लपवून विवाहबाह्य संबंध ठेवतात. विशेष म्हणजे काही प्रकरणांमध्ये संबंधित पुरुष हे दुसऱ्या महिलेला आपलं लग्न झालंय याची कल्पनादेखील देत नाहीत. ते लग्न झाल्याची माहिती लपवून दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवतात. काही जण तर पहिलं लग्न लपवून दुसरंही लग्न करतात. अशाप्रकारे ते दोन महिलांना फसवतात. पण अशाप्रकारचं कृत्य करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. कारण केंद्र सरकारने तशा हालचाली सुरु केल्या आहेत.

विवाहित असताना अविवाहित असल्याचा दिखावा करून किंवा खरी ओळख लपवून लग्न करणाऱ्यांना आता यापुढे 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. कारण केंद्र सरकार लवकरच याबाबत विधेयक आणणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे याबाबतच विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हालचाली सुरु केल्या आहेत. यामध्ये आपली ओळख लपवून, धर्म लपवून, जात लपवून लग्न करणारे किंवा संबध प्रस्थापित करणाऱ्या पुरुषांवर देखील कडक कारवाई करण्याबाबतचा कायदा असणार आहे.

सरकार लव्ह जिहादवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पावसाळी अधिवेशनात भारतीय दंड संहिता (IPC) 1860 मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने भारतीय न्यायिक संहिता 2023 (BNS) विधेयक IPC लोकसभेत सादर केले होते. या विधेयकात महिलांवरील गुन्ह्यांबाबत कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. या विधेयकात महिलेची ओळख लपवून तिच्याशी लग्न करणे हा गुन्हा ठरवण्यात आलाय. तसंच या तरतुदींमुळे सरकार लव्ह जिहादवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

…तर तो बलात्कार मानला जाणार नाही, पण…

याप्रकरणी आणखी एक महत्त्वाची माहिती मिळत आहे. एखाद्या व्यक्तीने आपली ओळख लपवून लग्न केलं किंवा महिलेशी संबंध प्रस्थापित केले. तर तो बलात्कार मानला जाणार नाही. पण छळ नक्कीच मानला जाईल. तरीही संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होईल. त्याच्यावर 10 वर्षांपर्यंतची शिक्षेची तरतूर असण्याची शक्यता आहे.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.