AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi in Gujrat : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर, आईच्या 100 व्या वाढदिवस साजरा करणार; स्वागतासाठी 25×10 फुटाची रांगोळी

PM Narendra Modi in Gujrat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन या आज 100 वर्षाच्या होत आहेत. या खास दिनी पंतप्रधान मोदी आपल्या आईसोबत असणार आहेत. त्याचबरोबर ते आज विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. बडोद्यात ते जवळपास 4 लाख लोकांना संबोधित करतील.

PM Modi in Gujrat : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर, आईच्या 100 व्या वाढदिवस साजरा करणार; स्वागतासाठी 25x10 फुटाची रांगोळी
नरेंद्र मोदी आई हिराबेन यांच्यासोबत (फाईल फोटो)Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 6:00 AM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन या आज 100 वर्षाच्या होत आहेत. या खास दिनी पंतप्रधान मोदी आपल्या आईसोबत असणार आहेत. हिराबेन यांच्या जन्मदिनानिमित्त वडनगरस्थित हाटकेश्वर मंदिरात पूजा ठेवण्यात आलीय. या पूजेत पंतप्रधान मोदी सहभागी होतील. यावेळी त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम स्वास्थ्य (Good Health) मिळावं म्हणून सुंदरकांड, शिव आराधना आणि भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी 11 मार्च रोजी आपल्या आईला भेटले होते. पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याच्या (Gujrat Visit) निमित्ताने जय्यत तयारी करण्यात आलीय. बडोद्यातील सहज रांगोळी ग्रुपच्या 5 कलाकारांनी सेंटर स्क्वेअर मॉलमध्ये मोदींची 25×10 फुटाची रांगोळी साकारली आहे. यात 150 किलो रांगोळीचा वापर करण्यात आलाय.

कोरोना महामारीच्या काळानंतर 11 मार्च रोजी पंतप्रधान मोदी आपल्या आईला तब्बल दोन वर्षांनी भेटले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा ते आपल्या आईची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर ते आज विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. बडोद्यात ते जवळपास 4 लाख लोकांना संबोधित करतील. पंतप्रधान मोदींचा हा कार्यक्रम सरदार इस्टेटच्या जवळील लेप्रोसी रुग्णालयात होणार आहे.

ATS कडून चारजण ताब्यात

दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसकडून नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्यापूर्वी चार जणांची चौकशी करण्यात आली. एटीएसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चार जणांना बुधवारी चौकशीनंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. यातील एकजण होमिपॅथिक डॉक्टर आहे. त्याचं बडोद्यात वाडी परिसरात क्लिनिकही आहे. अजून एक व्यक्ती बडोद्याचाच रहिवासी आहे. तर अन्य दोघे हे अहमदाबाद आणि भावनगरचे रहिवासी आहेत. दरम्यान, या चौघांची नियमित चौकशी होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र, गरज भासल्यास त्यांना पुन्हा बोलावलं जाईल, अशी माहिती एटीएसच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आलीय.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला महत्व

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय. कारण 2 दशके गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला पुन्हा एकदा सत्तेचा सोपान गाठणं सोपं असणार नाही. तसंच लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानांच्या स्वत:च्या राज्यात भाजपला झटका बसू नये असा नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा दौरा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातोय.

'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.