सुसाट, सुरक्षित आणि सुविधा…. ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, टॉप 9 वैशिष्ट्यं वाचाच !

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 10.30 वाजता वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. येत्या १ ऑक्टोबरपासून ही ट्रेन नियमितपणे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरून धावेल. देशाला अभिमान वाटावा, अशी या ट्रेनची वैशिष्ट्य आहेत.

सुसाट, सुरक्षित आणि सुविधा.... 'वंदे भारत' एक्सप्रेसचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, टॉप 9 वैशिष्ट्यं वाचाच !
वंदे भारत ट्रेनचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्धाटनImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 12:41 PM

मुंबईः सुसाट, सुरक्षित आणि सुविधायुक्त अशी आहे या सेमी हाय स्पीड रेल्वेची (High speed railway) ओळख. मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर या मार्गावरील बहुचर्चित वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) आज पहिल्यांदा धावली. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुजरात दौऱ्याच्या दुसर्या दिवशी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ट्रेनची पहिली फेरी गांधीनगरहून सुरु झाली. उद्यापाससून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून ही ती नियमितपणे मुंबई सेंट्रवरून धावेल.

  1. चेन्नईतल्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत फक्त 18 महिन्यांत ही ट्रेन तयार झाली. ताशी 160 किमी एवढ्या वेगानं ही ट्रेन सुसाट धावू शकते. काही सेकंदातच वेग पकडते. म्हणूनच वेग आणि सुविधांचे निकष पाहिले तर भारतीय रेल्वेची ही मोठी झेप मानली जातेय.
  2.  ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे, जीपीएस आधारीत ऑडिओ व्हिज्युअल प्रवासी सूचना प्रणाली, मनोरंजनासाठी ऑनबोर्ड हॉटस्पॉट, वायफाय सुविधा आहेत.
  3. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ट्रेनमध्ये 180डिग्रीत फिरणारे सीट आहेत. तसेच साइड रिक्लायनरलची सुविधा आहे.
  4. सुरक्षेसाठी कोचच्या बाहेर रिव्ह्यू कॅमेरे, चार प्लॅटफॉर्म साइड कॅमेरे लावले आहेत. नियंत्रणासाठी नव्या कोचमध्ये सेफ्टी इंटिग्रेशन सर्टिफिकेशन आहेत.
  5. विशेष म्हणजे ट्रेनमध्ये अटेंडंट कॉल बटण, बायो टॉयलेट, ऑटोमॅटिक डोअर, सीसीटीव्ही कॅमेरे, रिक्लायनिंग सुविधा आणि आरामदायी सीट आहेत..

पहा Next Gen Train–

6. देशातली ही तिसरी वंदे भारत रेल्वे आहे. यापूर्वी नवी दिल्ली- कटरा आणि नवी दिल्ली ते वाराणसी या दोन मार्गांवर ही ट्रेन सुरु करण्यात आली आहे.

7.  वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस अहमदाबादहून दुपारी 2 वाजता निघेल. त्याच दिवशी संध्याकाळी 7.35 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. मुंबई सेंट्रवरून सकाळी 6.20 वाजता ही ट्रेन असेल. दुपारी 12.30 वाजता ती गांधीनगरला पोहोचेल. रविवारी या ट्रेनला सुटी असेल.

8. ही ट्रेन जेवढी लक्झरी आहे. तसा तिकिटांच्या दरातही फरक आहे. मुंबई ते सूरत चेअर कारचं भाडं 690रुपये आहे.

9. मुंबई ते वडोदरा हे तिकिट 900 रुपये असेल. मुंबई ते अहमदाबाद हे तिकिट  1060 रुपये आहे. एक्झिक्युटिव्ह क्लासचे दर आणखी जास्त असणार आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.