मोदींच्या हस्ते बिरसा मुंडा संग्रहालयाचे उदघाटन, देशभरात आणखी 9 संग्रहालय उभारणार
पंतप्रधान म्हणाले की, देशाने ठरवले आहे की, स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवात आदिवासी परंपरा आणि त्यांच्या शौर्यगाथांना एक भव्य ओळख दिली जाईल. यामुळेच 15 नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती - 'आदिवासी गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रांची, झारखंडमधले आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संग्रहालयाचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, देशाने ठरवले आहे की, स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवात आदिवासी परंपरा आणि त्यांच्या शौर्यगाथांना एक भव्य ओळख दिली जाईल. यामुळेच 15 नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती – ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. भारताच्या प्राचीन आदिवासी संस्कृतीचा गौरव करण्याचा हा दिवस आहे, पंतप्रधान म्हणाले.
भगवान बिरसा मुंडा स्मृति उद्यान सह स्वतंत्रता सेनानी संग्रहालय के लिए पूरे देश के जनजातीय समाज, भारत के प्रत्येक नागरिक को बधाई देता हूं।
ये संग्रहालय, स्वाधीनता संग्राम में आदिवासी नायक-नायिकाओं के योगदान का, विविधताओं से भरी हमारी आदिवासी संस्कृति का जीवंत अधिष्ठान बनेगा: PM
— PMO India (@PMOIndia) November 15, 2021
आज के ही दिन हमारे श्रद्धेय अटल जी की दृढ़ इच्छाशक्ति के कारण झारखण्ड राज्य भी अस्तित्व में आया था।
ये अटल जी ही थे जिन्होंने देश की सरकार में सबसे पहले अलग आदिवासी मंत्रालय का गठन कर आदिवासी हितों को देश की नीतियों से जोड़ा था: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 15, 2021
अटल बिहारी वाजपेयींची आठवण
आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, या दिवशीच झारखंड राज्य पूज्य अटलजींच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे अस्तित्वात आले. देशाच्या सरकारमध्ये स्वतंत्र आदिवासी मंत्रालय स्थापन करणारे आणि आदिवासी हित देशाच्या धोरणांशी जोडणारे अटलजी होते.
पंतप्रधान म्हणाले, भगवान बिरसा मुंडा स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयासारखी देशातील विविध राज्यांमध्ये अशा आणखी 9 संग्रहालयांवर काम वेगाने सुरू आहे. लवकरच गुजरातमधील राजपिपला, आंध्र प्रदेशातील लंबासिंगी, छत्तीसगडमधील रायपूर, केरळमधील कोझिकोड, मध्य प्रदेशातील छिंदवाडा, तेलंगणातील हैदराबाद, मणिपूरमधील तामिंगलाँग, मिझोराममधील केल्सी, गोव्यातील पोंडा येथे ही याच प्रकाराची संग्रहालये असतील.
हे ही वाचा