पंतप्रधान नरेंद्र मोदी सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं उद्घाटन, आज संध्याकाळी भव्य सोहळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. राजधानी दिल्लीत आज शानदार कार्यक्रम पार पडणार आहे.
नवी दिल्ली : देशाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. राजधानी दिल्लीत आज शानदार कार्यक्रम पार पडणार आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याचंही अनावरण यावेळी करण्यात येणार आहे. राजपथच नाव कर्तव्यपथ केलं जाणार आहे. इंडिया गेट आणि कर्तव्यपथ पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेसाठी खुला होणार आहे. तब्बल वीस हजार कोटींच्या या भव्य प्रकल्पाचं आज उद्घाटन केलं जाणार आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात राजधानी नवी दिल्लीमधून आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी अधिक माहिती दिली आहे. पाहा…