AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रासह दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

देशातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्रासह दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. (PM Modi interacts 54 district collectors)

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रासह दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 10:14 AM

नवी दिल्ली : देशातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्रासह दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. येत्या 20 मे रोजी व्हिडीओ कॉन्सफन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी संवाद साधतील. यावेळी ते महाराष्ट्रासह 10 राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतील. (PM Narendra Modi interacts with 54 district collectors from Maharashtra and other state)

वाढत्या कोरोनावर संवाद

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी 20 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. यावेळी महाराष्ट्रासह कोरोनामुळे प्रभावित 10 राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. यात ते वाढता कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न करावेत, कोरोना लसीकरण कसे वाढवू शकतो, याशिवाय विविध विषयांवर संवाद साधतील.

54 जिल्हाधिकारी उपस्थित राहणार 

पंतप्रधान मोदी 20 मे रोजी सकाळी 11  वाजता ही बैठक घेतील. यावेळी 54 जिल्हाधिकारी उपस्थित राहतील. दरम्यान या बैठकीला महाराष्ट्रासह इतर कोणकोणत्या दहा राज्यातील जिल्हाधिकारी सहभागी होतील, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा साडेतीन लाखांच्या पार

दरम्यान देशातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ (Corona Cases in India) पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात साडेतीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णसंख्येत जवळपास 14 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 3 लाख 62 हजार 727 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 120 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. गेले सलग दोन दिवस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 3,62,727

देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,52,181

देशात 24 तासात मृत्यू – 4,120

एकूण रूग्ण – 2,37,03,665

एकूण डिस्चार्ज – 1,97,34,823

एकूण मृत्यू – 2,58,317

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण –  37,10,525

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 17,72,14,256

गेल्या 7 दिवसात देशात बाधित रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी 

तारीख –       बाधित रुग्ण          – मृत्यू 

12 मे : 3 लाख 48 हजार 421 – 4205 11 मे : 3लाख 29 हजार 942 – 3876 10 मे : 3लाख 66 हजार 161 – 3754 9 मे : 4 लाख 03 हजार 738 – 4092 8 मे : 4 लाख 01 हजार 078 – 4187 7 मे : 4 लाख 14 हजार188 – 3915 6 मे : 4 लाख 12 हजार 262 – 3980

(PM Narendra Modi interacts with 54 district collectors from Maharashtra and other state)

संबंधित बातम्या : 

Corona Cases in India | देशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा साडेतीन लाखांच्या पार, कोरोनाबळीही 4100 वर

इमेजपेक्षा आयुष्यात बरंच काही महत्त्वाचं, अनुपम खेर यांची मोदींवर पहिल्यांदाच थेट टीका

कोरोनाच्या लस कधी मिळणार? किती मिळणार?; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अखेर मौन सोडलं

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.