Rahul Gandhi : ‘मोदीजी तर देवाला पण सांगू शकतात, संपूर्ण ब्रह्मांडात काय सुरु आहे ते’, राहुल गांधी यांचा तिरकस बाण

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी परदेशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी पंतप्रधानांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत...

Rahul Gandhi : 'मोदीजी तर देवाला पण सांगू शकतात, संपूर्ण ब्रह्मांडात काय सुरु आहे ते', राहुल गांधी यांचा तिरकस बाण
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 10:00 AM

नवी दिल्ली : भारतात राजकारण करणं आता सोपं काम नाही. यापूर्वी जनसभा, चर्चा, कोपरा बैठका, मोर्चे, यात्रा या आयुधांचा जनतेशी संपर्कासाठी वापर होत होता. पण आता ती बोथट झाली आहे. राजकीय संसाधनावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंयसेवक संघाचे (BJP & RSS) नियंत्रण आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय नेत्यांना धमक्या देण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या अख्त्यारीतील विविध यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे देशात राजकारण करणं आता सोपं काम राहिलं नाही. तरीही काँग्रेसने कन्याकुमारीपासून यात्रा काढली. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील बदलांवर परदेशात टीका केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर (PM Narendra Modi) अनेक गंभीर आरोप केले.

ते तर सर्वज्ञ ‘जग इतके मोठे आहे की, कोणतीही व्यक्ती हा दावा करु शकत नाही की, त्याला सर्व काही माहिती आहे. पण काहींना हा आजार आहे. भारतात काही लोक असे आहेत की आपल्याला सर्व काही माहिती आहे, असे त्यांना वाटते. त्यांना तर देवापेक्षा आपल्याला अधिक माहिती आहे, असे वाटते. जगभरात काय घडामोड सुरु आहे, याची वित्तं बातमी ते देवाला सांगण्याची हिम्मत करु शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यापैकी एक आहेत.’ राहुल गांधी यांनी असा तिरकस बाण सोडला.

ते ब्रह्मांडज्ञानी ‘ते देवाला ब्रह्मांडचे ज्ञान देऊ शकतात. देव पण संभ्रामत पडेल, की त्याने हे काय तयार केले. सध्या भारतात हेच सुरु आहे. भारतात सध्या असे काही लोक आहेत, जे सर्वकाही जाणतात. वैज्ञानिक, इतिहासकार, लष्कर, विमान हे जिथे जातील तिथे यांना सर्वकाही माहिती असतं. पण खरं पाहता, त्यांना काहीच माहिती नसतं’, असा चिमटा काढायला ही राहुल गांधी विसरले नाहीत.

हे सुद्धा वाचा

यात्रा थांबविण्याचा प्रयत्न भारतात शांतता, सौहार्द तयार करण्यासाठी आपण भारत जोडो यात्रा सुरु केली. 5-6 दिवसांनी लक्षात आले की, ही यात्रा सोपी नाही. गुडघ्यांनी उत्तर दिले होते. त्रास होत होता. पण आम्ही निर्धाराने पुढे गेलो. लोकांचे प्रेम मिळत गेले. लोकांच्या मनावरील दडपण कमी झाले. आमचा थकवाच गायब झाला. ही यात्रा आमची एकट्याची नसून ती संपूर्ण भारताचीच यात्रा झाली. आमचा थकवा कधीचाच पळून गेला. आम्हाला लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले. भाजपनं भारत जोडो यात्रा थांबविण्यासाठी पोलिसांचा, यंत्रणांचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात यश आले नाही. राहुल गांधी यांनी यात्रेतील अनुभव सर्वांसोबत शेअर केले.

अमेरिकेतून पुन्हा वाग्बाण काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेत पोहचल्यावर मंगळवारी त्यांनी सॅन फ्रान्सिस्को शहरात भारतीयांशी वार्तालाप केला. त्यांनी स्थानिक लोकांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सध्याच्या भारतातील घडामोडी आणि परिस्थितीवर त्यांचे मत मांडले.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.