Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Bharat | मोदींच्या हस्ते उद्घाटन, 9 नव्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये काय खास?

Vande Bharat | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाचवेळी 9 वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला. यामुळे 11 राज्यात धार्मिक आणि पर्यटन कनेक्टिविटी चालना मिळेल. नव्या ट्रेन्समध्ये अत्याधुनिक सोयी-सुविधा आहेत.

Vande Bharat | मोदींच्या हस्ते उद्घाटन, 9 नव्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये काय खास?
Vande Bharat
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 1:14 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 राज्यांना मोठी भेट दिलीय. त्यांनी रविवारी 9 वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला. यात राजस्थान, तामिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल. केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरात या राज्यात कनेक्टिविटी वाढणार आहे. वंदे भारत आपल्या रुटवरील सर्वात वेगवान ट्रेन असेल. त्यामुळे प्रवाशांचा बराचसा वेळ वाचेल. ट्रेनच्या नवीन कोचमध्ये नवीन सुविधा मिळणार आहेत. देशात आधीपासूनच 25 वंदे भारत ट्रेन धावत असल्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. आता आणखी 9 ट्रेन्सची भर पडलीय. तो दिवस दूर नाही, जेव्हा देशातील सर्व भाग या ट्रेनने जोडले जातील. वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता सतत वाढतेय, असं पंतप्रधान मोदींनी 9 वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सांगितलं. या ट्रेन्समधून आतापर्यंत 1,11,00,000 प्रवाशांनी प्रवास केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 नव्या मार्गावरील वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला. आता या ट्रेन्सची संख्या 34 झाली आहे. वंदे भारत ट्रेन्सना भगव्या रंगात रंगवण्यात आलय. केरळच्या कासारकोड ते त्रिवेन्द्रम दरम्यान वंदे भारत ट्रेन चालू झालीय. या ट्रेन्समध्ये आधीपेक्षा अधिक सोयी-सुविधा आहेत. सीटस जास्त रिक्लाइन होतील. कोचच्या आतमधील लायटिंग आणखी सुंदर बनवण्यात आलीय. टॉयलेटच्या आतमधील लायटिंगची पावर वाढवण्यात आलीय.

‘अमृत भारत स्टेशन’ काय असेल?

“देशात आधुनिक कनेक्टिविटी विस्ताराची ही अभूतपूर्व संधी असल्याचे पीएम मोदी म्हणाले. इन्फ्रास्ट्रक्चर विकासाची गती आणि स्केल 140 कोटी भारतीयांच्या आशा-अपेक्षांना साजेशी आहे. आजच्या भारताला हेच हवं आहे. आता ज्या ट्रेन सुरु केल्यात, त्या पहिल्या ट्रेनच्या तुलनेत जास्त आधुनिक आणि आरामदायक आहेत. वंदे भारत ट्रेन नव्या भारताचा जोश, नवीन उत्साहाची प्रतीक आहे. असे अनेक रेल्वे स्टेशन्स आहेत, ज्यांचा मागच्या काही वर्षात विकास झालेला नाही. या स्टेशन्सच्या विकासाच काम चालू आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. अमृत काळात बनणाऱ्या रेल्वे स्टेशन्सना ‘अमृत भारत स्टेशन’ म्हटलं जाईल. 9 नव्या वंदे भारत ट्रेन्सच वैशिष्ट्य काय?

वॉश बेसिनची डेप्थ वाढवण्यात आलीय. टॉयलेट हँडलच्या ग्रिपमध्ये पहिल्यापेक्षा जास्त सुधारणा करण्यात आलीय.

मोबाइल चार्जिंग पॉइंटला जास्त एक्सेसेबल बनवलं गेलय. फायर सिस्टम फूल प्रूफ बनवण्यात आलीय.

सीटिंग चेयरसमोर मॅगजीन बॅग्ससाठी जागा बनवण्यात आलीय.

दराबाद-बंगळुरु वंदे भारत एक्सप्रेस 2.5 तास वेगवान असेल. तिरुनेलवेली-मदुरै-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस 2 तास फास्ट असेल.

रांची-हावड़ा वंदे भारत एक्सप्रेस, पटना-हावड़ा वंदे भारत एक्सप्रेस आणि जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस जवळपास 1 तास फास्ट असेल.

उदयपुर-जयपुर वंदे भारत एक्सप्रेस जवळपास तासभर फास्ट असेल.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.