नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झालेल्या बैठकीत आमचं सर्व म्हणणं गांभीर्याने ऐकून घेतले आहे. आता ते या सगळ्यावर सकारात्मक निर्णय घेतील, अशी आशा आम्हाला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. (CM Uddhav Thackeray press conference in Maharashtra Sadan live updates after PM Modi meet)
ते मंगळवारी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितला. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या प्रत्येक विषयाचे विस्तृत पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी मी या सगळ्याची माहिती घेऊन त्यामध्ये लक्ष घालतो, असे आश्वासन दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल पावणेदोन तास चर्चा केली. या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा समावेश होता. यावेळी अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केंद्राने महाराष्ट्राला जीएसटी थकबाकीची रक्कम तातडीने अदा करावी, अशी मागणीही केल्याचे समजते.
>> मराठा आरक्षणाचा विषय आहे
>> दुसरा महत्त्वाचा विषय इतर मागासवर्ग आरक्षणाबाबतचा हा विषय देशपातळीवरचा आहे.
>> मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण
>> चौथा मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय
>> जीएसटीचा विषय, वेळेवर जीएसटी येणे
>> शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रस्न – पीक कर्ज असतं तसं पीक विमा आहे, त्याच्या अटीशर्तीबाबत चर्चा, महाराष्ट्रात बीड पॅटर्नची माहिती दिली
>> राज्यांमध्ये पाल.. स्पर्धात्मक
>> महत्त्वाचा विषय मुंबईमध्ये केली होती – गेली काही वर्षे महाराष्ट्रात किनारपट्टीच्या भागात चक्रीवादळं येत आहेत. मदतीचे निकष जुने झाले आहेत, ते बदलणे ९आवश्यक आहे, राज्य सरकारने गेल्यावर्षी निकष बदलून मदत केली. मुलात NDRF चे निकष बदलणे आवश्यक
>> चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी
>> मराठा भाषेला अभिजात दर्जा मिळावा
(CM Uddhav Thackeray press conference in Maharashtra Sadan live updates after PM Modi meet)