प्रत्येक शेतकऱ्यानं मोदींच्या भाषणातले हे 10 मुद्दे वाचलेच पाहिजे, बघा काय म्हणाले मोदी ?

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायद्यांबद्दल चर्चा शेतकऱ्यांशी चर्चा केली.

प्रत्येक शेतकऱ्यानं मोदींच्या भाषणातले हे 10 मुद्दे वाचलेच पाहिजे, बघा काय म्हणाले मोदी ?
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 3:35 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील किसान महासंमेलनामध्ये देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायद्यांबद्दल चर्चा शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी एमएसपी, कोल्ड स्टोरेज, एपीएमसी मंडळं आणि कंत्राटी शेतीबाबत शेतकऱ्यांचा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोदी म्हणाले की, कंत्राटी शेतीचा जमिनीशी काही संबंध नाही. नैसर्गिक आपत्ती झाली तरी शेतकर्‍याला पूर्ण पैसे मिळतात. यावेळी बोलताना मोदींनी विरोधकांवरही टीका केली आहे. मोदींच्या या संवादातील 10 महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे….

मोदींच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे

1) 25 डिसेंबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा आणखी एक हप्ता कोट्यावधी शेककऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल, यावेळी मी पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी संवाद साधेन

2) अद्यापही काही शंका असेल तर आम्ही मान झुकवून-हात जोडून प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्यासाठी तयार आहोत. देशातील शेतकरी आणि शेतकऱ्यांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे. पुन्हा एकदा 25 डिसेंबर रोजी मी देशातील शेतकऱ्यांशी चर्चा करेन

3) काँग्रेसने गेल्या दहा वर्षात फक्त एकदा 50 हजार कोटीच्या कर्ज माफीची घोषणा केली, पण आमच्या सरकारने किसान सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी 75 हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं.

4) काँग्रेस जेवढं आश्वासन देते तितकं कर्ज माफ करत नाही. याचा फायदा काँग्रेसच्या जवळच्या आणि नातेवाईकांना मिळतो. हे फक्त मोठ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत होते आणि त्यांना असं वाटायचं की त्यांचं काम संपलं.

5) मला क्रेडिट देऊ नका. तुमच्या जुन्या घोषणापत्रांना द्या. मला शेतकऱ्यांचा फायदा हवा आहे. तुम्ही (काँग्रेस) शेतकऱ्यांना भ्रमित करु नका. हा कायदा लागू होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्तचा कालावधी झाला आहे, पण अचानक विरोधक असे मुद्दे उचलत आहेत. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवली जात आहे.

6) आम्ही शेतकऱ्यांना दीडपट जास्त MSP दिला. काँग्रेसने केलेली कर्जमाफी हा सर्वात मोठा धोका आहे. मध्य प्रदेशातील निवडणुकीवेळी 10 दिवसात कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं पण केलं नाही, राजस्थानातही तेच झालं.

7) ज्यांची राजकीय जमीन गेली. ते आज शेतकऱ्यांना घाबरवत आहेत की त्यांची जमीन जाईल. जे आज अश्रू गाळत आहेत. त्यांनीच आठ वर्षांपर्यंत स्वामीनाथन रिपोर्टला दाबून ठेवलं होतं. यांनी शेतकऱ्यांवर खर्च केला नाही.

8) जे काम 25 वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं ते आज करावं लागत आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या त्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. ज्या गेल्या अनेक वर्षांपासून रोखण्यात आल्या होत्या.

9) शेतकऱ्यांसाठी जो कायदा तयार करण्यात आला आहे. तो रात्रभरात तयार झालेला नाही. गेल्या दशकापासून केंद्र, राज्य सरकार आणि उइतर संस्था यावर चर्चा करत आहेत.

10) 2014 च्या आधी 5 वर्ष शेतकऱ्यांकडून फक्त दीड लाख मेट्रिक टन डाळ खरेदी केली गेली. आम्ही शेतकऱ्यांकडून 112 लाख मेट्रिक टन डाळ खरेदी केली आहे.

इतर बातम्या – 

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संसदीय कार्यालय OLX वर विक्रीला?

PM Modi | आम्ही मान झुकवून-हात जोडून प्रत्येक मुद्यावर चर्चेसाठी तयार आहोत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.