Narendra Modi Joe Biden Meeting : नरेंद्र मोदींनी घेतली जो बायडेन यांची भेट, दोन बलाढ्य नेत्यांमध्ये बैठक, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
Narendra Modi Joe Biden Meeting | पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची आज भेट घेतली. दोन राष्ट्रप्रमुखांची ही पहिलीच भेट आहे.
PM Narendra Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची आज भेट घेतली. दोन राष्ट्रप्रमुखांची ही पहिलीच भेट होती. या भेटीकडे भारत, अमेरिकाच नाही तर संपर्ण जगाचे लक्ष होते. आजच्या भेटीत द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. (pm narendra modi meeting with joe biden in america white house with quad leaders)
A special day indeed! PM @narendramodi with @POTUS Joseph Biden at the White House for their bilateral engagement. pic.twitter.com/eGW3jGBBvm
— Arindam Bagchi (@MEAIndia) September 24, 2021
जो बायडेन यांनी केला पंतप्रधान मोदी यांचे स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जो बायडेन यांची व्हाईट हाऊस येथे भेट घेतली. यावेळी मोदी यांच्या स्वागतासाठी जो बायडेन जातीने हजर राहिले. मोदी यांनी प्रवेश करताच बायडेन यांनी मोदीचा हात हातात घेत स्वागत केले.
#WATCH Prime Minister Narendra Modi receives a warm welcome from US President Joe Biden at the White House pic.twitter.com/SEp29Rrl5g
— ANI (@ANI) September 24, 2021
निर्धारित वेळेपेक्षा 40 मिनिटे जास्त चालली बैठक
मोठ्या नेत्यांची बैठक म्हटलं की कार्यक्रमांचे काटेकोरपणे नियोजन केले जाते. मोदी आणि बायडेन यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये मात्र या नियोबद्धतेकडे थोडं दुर्लक्ष करण्यात आलं. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 100 मिनिटे चर्चा झाली. निर्धारित वेळेपेक्षा चाळीस मिनिटे जास्त ही बैठक चालली.
कोरोना लसीच्या आढाव्यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा
बायडेन आणि पीएम मोदी या भेटीनंतर क्वाड संमेलनाला हजेरी लावतील. जो बायडेन यांनी या शिखर परिषदेचे आयोजन केलं आहे. पीएम मोदी, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन या क्वाड शिखर परिषदेला उपस्थित राहतील. मार्चमध्ये क्वाड नेत्यांमध्ये व्हर्च्युअल बैठक झाली होती. आज होणाऱ्या क्वाड बैठकीत, जगभरातील कोरोना लसीचा आढावा घेण्यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.
इतर बातम्या :