करो योग, रहो निरोग, योगा जागतिक चळवळ, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे यांचा संदेश; जगभरात योगा दिन जल्लोषात

महाराष्ट्रासह देशात आणि जगभरात आज योगा दिन जल्लोषात साजरा केला जात आहे. सकाळी सकाळीच प्रत्येक मैदान आणि गार्डनमध्ये शेकडो लोक योगा करताना दिसत आहेत. या दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमेरिकेतून खास संदेश दिला आहे.

करो योग, रहो निरोग, योगा जागतिक चळवळ, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे यांचा संदेश; जगभरात योगा दिन जल्लोषात
international yoga dayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 8:13 AM

नवी दिल्ली : भारतासह जगभरात आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमेरिकेतून योगा दिवसानिमित्ताने व्हिडीओ संदेश जारी केला आहे. योगा जागतिक चळवळ झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच संयुक्त राष्ट मुख्यालयातील योगा कार्यक्रमातही त्यांनी भाग घेतला. तर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही योगा दिनाच्या कार्यक्रमात भाग घेऊन योगाही केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडीओद्वारे न्यूयॉर्कमधून योगा दिनानिमित्ताने देशवासियांशी संवाद साधला. योग हा जागतिक चळवळ झाला आहे. योग एक विचार होता. तो आज जगाने स्वीकारला आहे. योग आज ग्लोबल स्पिरीट बनला आहे. योगाने नेहमीच जोडण्याचं काम केलं आहे. आमचे आदर्श, भारताचे दर्शन असो किंवा दृष्टी प्रत्येकाला योगाने जोडलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नव्या विचाराचं स्वागत

आम्ही नव्या विचाराचं नेहमीच स्वागत केलं आहे. नव्या विचारांना संरक्षण दिलं आहे. आपल्या विविधतेला समृद्ध केलं आहे. त्याचा उत्सव केला आहे. योगामुळे आपल्या अंतदृष्टीचा विस्तार होतो. एकतेची अनुभव देणाऱ्या चेतनेशी योग आपल्याला जोडत असतो, असंही मोदींनी सांगितलं.

मुंबईसह महाराष्ट्रात योगा उत्साहात

मुंबईसह महाराष्ट्रातही योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईतील मैदाने, गार्डन आणि बीचवरही योगा दिन साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मुंबईकरांनी भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने बांद्रा येथील योगा गार्डनमध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी योगा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल देखील उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक आणि पोलीस देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला इस्राईलच्या राजदूतांना देखील खास निमंत्रण देण्यात आलं होतं.

करो योग, रहो निरोग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही योगाच्या कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी त्यांनी करो योग, रहो निरोगचा संदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योग दिनानिमित्त जगभरात नेतृत्व करणार आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. आरोग्याची गुरुकिल्ली आपल्या देशाने जगाला दिली हे महत्त्वाचं आहे. मी आता येत होतो, तेव्हा सर्वत्र मुंबईकर योगा करताना पाहायला मिळत आहेत. पांडुरंग कदम यांना घश्याचा कॅन्सर होता. तो योगाने नाहीसा झाला. या धकाधकीच्या आणि स्ट्रेसफुल आयुष्यात योग फार महत्त्वाचे आहेत. 35 लोक एक सोबत योगा करतील याचा आयोजन आपण केलेलं आहे, असं ते म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.