Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळात जास्तीत जास्त किती मंत्र्यांना जागा मिळू शकते, जाणून घ्या फॉर्म्युला

Modi Cabinet Expansion : कदाचित या विस्तारानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ 81 ही कमाल पातळी गाठेल, असे सांगितले जात आहे. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी वगळता 21 कॅबिनेट मंत्री, 9 स्वतंत्र कार्यभार असलेले मंत्री, आणि 23 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळात जास्तीत जास्त किती मंत्र्यांना जागा मिळू शकते, जाणून घ्या फॉर्म्युला
मंत्रिमंडळात एकूण लोकसभा खासदारांच्या संख्येच्या 15 टक्के मंत्र्यांचा समावेश
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 2:25 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये सत्ताग्रहण केल्यानंतर केंद्रात पहिलावहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडत आहे. महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे, उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आणि 2024 ची लोकसभा निवडणूक या अनुषंगाने या मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) कोणाला स्थान मिळणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. संध्याकाळी सहा वाजता दिल्लीत नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. यावेळी 43 नेत्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. (PM Modi cabinet expansion formula by constitution of India)

कदाचित या विस्तारानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ 81 ही कमाल पातळी गाठेल, असे सांगितले जात आहे. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी वगळता 21 कॅबिनेट मंत्री, 9 स्वतंत्र कार्यभार असलेले मंत्री, आणि 23 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात आता नक्की किती जणांना स्थान मिळणार, यासाठी आखून दिलेल्या मर्यादेला मोदी स्पर्श करणार, का हे स्पष्ट होण्यासाठी आणखी काही तास जावे लागतील.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला?

केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण लोकसभा खासदारांच्या संख्येच्या 15 टक्के मंत्र्यांचा समावेश असावा, असा नियम आहे. सध्याच्या लोकसभेत 552 खासदार आहेत. त्यानुसार आकडेमोड केल्यास केंद्रीय मंत्रिमंडळात 82 पेक्षा जास्त नेत्यांना घेता येणार नाही. सध्या मंत्रिमंडळात 53 मंत्री आहेत. त्यामुळे आणखी 29 मंत्र्यांचा नव्याने समावेश करता येईल. उर्वरित नेत्यांच्या समावेशासाठी काही विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरच रस्ता दाखवला जाईल. भाजपमध्ये संघटनात्मक पदांवर वर्णी लावून त्यांचे पुनर्वसन करता येईल.

नव्या कॅबिनेटची रचना कशी असेल?

1. अनुच्छेद 74 नुसार राष्ट्रपती मंत्रिपरिषदेची स्थापना करतात. 2. मंत्रिपरिषदेच्या सर्वोच्चपदी पंतप्रधान असतात. 3. पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती मंत्रिमंडळातील नेत्यांच्या नावाला सहमती देतात. 4. संविधानातील अनुच्छेद 75(1) नुसार, पंतप्रधानांची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून केली जाते. 5. मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा किंवा नाही, याचे सर्वाधिकार पंतप्रधानांकडे असतात.

राष्ट्रपतींचा अधिकार पण पंतप्रधानांचा सल्ला महत्वाचा

अनुच्छेद 77 अंतर्गत मंत्रालयातील विभागांची निर्मिती होते. हे कामही राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानेच करतात. लोकसभेविषयीचे उत्तरदायित्व ही केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिक जबाबदारी असते. कोणत्याही नेत्याने मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी राष्ट्रपतींकडून त्याला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाते.

संबंधित बातम्या:

Modi Cabinet Expansion LIVE Updates : पीएम मोदींच्या निवासस्थानावरील बैठक संपली, केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांचा राजीनामा

असे क्षण महत्त्वाचे असतात; नितेश राणे-निलेश राणे दिल्लीत दाखल

राणे, कपिल पाटलांचं मंत्रिपद फिक्स?, मोदींच्या निवासस्थानी दाखल; तर्कवितर्कांना उधाण

(PM Modi cabinet expansion formula by constitution of India)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.