इंदिरा गांधी नंतर एकही पंतप्रधान ज्या देशात गेला नाही, तिथे पीएम मोदी 7 व्यां दा का चाललेत?
इंदिरा गांधी 1981 साली पंतप्रधानपदी असताना या देशाच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यानंतर कुठल्याही पंतप्रधानाने जवळपास साडेतीन दशक या देशाचा दौरा केला नाही. पंतप्रधानपदी मोदी आल्यानंतर नव्याने या देशासोबत मैत्री संबंधांची सुरुवात झाली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परदेश दौऱ्यावर चाललेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे नेहमीच चर्चेत असतात, कारण तिथे गेल्यानंतर एका मिनी भारताची झलक दिसून येते. मोदींच भव्य स्वागत, तिथल्या भारतीयांना संबोधन हे आता मोदींच्या परदेश दौऱ्यात सवयीच झालय. मोदी आज ज्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत, तो अनेक अर्थांनी वेगळा आहे. कारण इंदिरा गांधींनंतर या देशाच्या दौऱ्यावर कुठलाही भारतीय पंतप्रधान गेला नाही. पलटूनही पाहिलं नाही, त्या देशात मोदी सातव्यांदा चाललेत. मागच्या आठ महिन्यात पीएम मोदी तिसऱ्यांदा मध्य पूर्वेच्या या देशात चालले आहेत. 13 आणि 14 फेब्रुवारीला पीएम मोदी यूएईच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 2014 साली पंतप्रधान बनल्यानंतर पीएम मोदी यांचा हा सातवा यूएई दौरा आहे.
या दौऱ्यात पीएम मोदींची यूएईचे राष्ट्रपती मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यासोबत भेट होईल. अलीकडच्या काळात दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध दृ्ढ झाले आहेत. सरकारी स्टेटमेंटनुसार, “दोन्ही देशांमध्ये रणनितीक भागीदारी, परस्परांच्या हिताचे क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर सखोल, विस्तृत चर्चा होईल” यूएईच्या राष्ट्रपतीशिवाय पंतप्रधान मोदींची उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांशी भेट निश्चित आहे. पीएम दुबईत विश्व सरकार शिखर सम्मलेनातही सहभागी होऊन भाषण देतील.
बापरे, दोन्ही देशांमध्ये इतक्या बिलियन डॉलरचा व्यापार
दुबईनंतर पीएम मोदी अबू धाबीला जातील. अबू धाबीमधील पहिल हिंदू मंदिर BAPS च उद्घाटन करतील. इथे ते पुन्हा भारतीय समुदायाला संबोधित करतील. राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक हे भारत-यूएई संबंधांचा आधार आहे. द्विपक्षीय व्यापारामुळे दोन्ही देश अजून जवळ आले आहेत. 2020-23 च्या अधिकृत आकड्यानुसार भारत-यूएईमध्ये जवळपास 85 बिलियन अमेरिकी डॉलरचा व्यापार झालाय.
पीएम मोदी कुठल्या वर्षी, किती वेळा या देशाच्या दौऱ्यावर गेलेत
इंदिरा गांधी 1981 साली पंतप्रधानपदी असताना यूएईच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यानंतर कुठलाही पंतप्रधान जवळपास साडेतीन दशक यूएईच्या दौऱ्यावर गेला नाही. पंतप्रधानपदी मोदी आल्यानंतर नव्याने मैत्री संबंधांची सुरुवात झाली. पीएम मोदी यांनी आतापर्यंत 2015, 2018, 2019, 2022, 2023 मध्ये दोनवेळा आणि आता 2024 च्या सुरुवातीला ते यूएईच्या दौऱ्यावर चालले आहेत.
भारतीय समुदायाचे किती लाख लोक या देशात राहतात?
भारतासाठी यूएई खूप आवश्यक आहे, कारण 2022-23 दरम्यान भारतात गुंतवणूक करणाऱ्या टॉप 4 देशांमध्ये यूएई आहे. संयुक्त अरब अमीरातमध्ये भारतीय समुदायाचे जवळपास 35 लाख लोक राहतात. भारत यूएईमधला सर्वात मोठा प्रवासी समूह आहे. दोन्ही देशांदरम्यान फेब्रुवारी 2022 मध्ये एका व्यापक आर्थिक करारावर स्वाक्षरी झाली.