PM Modi | PM मोदींच्या पुढाकारामुळे टळला एका देशावरील अणूबॉम्ब हल्ला, विश्वसनीय रिपोर्टमधून समोर आलं सत्य
PM Modi | जगात सर्वप्रथम 1945 साली अणवस्त्रांचा वापर झाला होता. अमेरिकेने जापानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणूबॉम्ब टाकला होता. जगाने त्यावेळी पहिल्यांदा अणूबॉम्ब किती भयानक आहे? मानवी जीवन कसं उद्धवस्त होऊ शकतं, हे पाहिलं. अशाच प्रकारच्या अणवस्त्र हल्ल्याची पुन्हा एकदा तयारी झाली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकारामुळे हे संकट टळलं.
नवी दिल्ली : सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील लोकप्रिय नेते आहेत. त्याचवेळी त्यांनी आपल्या कारभाराने आंतरराष्ट्रीय स्तरावरही छाप उमटवली आहे. भारताचे पंतप्रधान असण्याबरोबरच नरेंद्र मोदींकडे जागतिक नेते म्हणून सुद्धा पाहिलं जातं. नुकताच एक रिपोर्ट समोर आलाय. त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तक्षेपामुळे एक मोठा जागतिक धोका टळल्याचा दावा करण्यात आला आहे. कादचित अस घडलं असतं, तर महाविनाशकारी नुकसान जगाला पहाव लागल असतं. पण पंतप्रधान मोदींच्या यशस्वी मध्यस्थीमुळे हा धोका टळला. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाला दोन वर्ष लोटली आहेत. अजूनही हे युद्ध सुरुच आहे. 2022 मध्ये या युद्धाला सुरुवात झाली. त्यावेळी अणवस्त्रांचा वापर होणार होता, पण पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपामुळे हे अणवस्त्र युद्ध यशस्वीरित्या टाळता आलं. इंटरनॅशनल एजन्सी सीएनएनच्या रिपोर्ट्मधून ही माहिती समोर आली आहे.
भारतासह अन्य काही देशांनी सुद्धा हे संकट टाळण्यात सक्रीय भूमिका बजावली होती, असं या रिपोर्ट्मध्ये म्हटलं आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने CNN ने हा रिपोर्ट बनवला आहे. रशिया युक्रेनच्या काही शहरांवर अणूबॉम्ब टाकू शकतो, ही चिंता बायडेन प्रशासनाला होती. सीएनएनच्या रिपोर्ट्नुसार, अणवस्त्राच्या वापराची शक्यता लक्षात घेऊन अमेरिकेने असा हल्ला रोखण्यासाठी भारतासह काही देशांची मदत घेतली होती. त्यासाठी अभियान चालवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य सहकाऱ्यांच्या मदतीमुळे अणवस्त्र हल्ल्याच संभाव्य संकट टाळता आलं, असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी या रिपोर्ट्मध्ये म्हटलं आहे. अमेरिकन अधिकाऱ्याने खासकरुन भारताच विशेष कौतुक केलय. भारताने शांततेसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले.
मोदी पुतिन यांना काय म्हणालेले?
रशिया-युक्रेन युद्धात भारत तटस्थ राहिला. दोन्ही बाजूने होणाऱ्या हिंसाचाराची निंदा केली. भारताने कोणाचीही बाजू न घेतात शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढावा, असं आवाहन केलं. मागच्यावर्षी उज्बेकिस्तानमध्ये SCO शिखर संमेलन झालं. त्यावेळी हे युद्धाच युग नाहीय, असं पंतप्रधान मोदी व्लादिमीर पुतिन यांना म्हणाले होते. भारताच्या अध्यक्षतेखाली G20 ची शिखर परिषद झाली. त्यावेळी सुद्धा हेच वक्तव्य करण्यात आलं.