गुजरात दंगलीवर नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले, प्रथमच गोध्रा प्रकरणावर भाष्य करत म्हणाले…
PM Modi Podcast With Lex Fridman: गुजरात दंगलीच्या वेळी केंद्रात विरोधी पक्षाचे सरकार होते. त्यांनी खोट्या खटल्यांमध्ये आम्हाला शिक्षा व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु न्यायव्यवस्थेने संपूर्ण घटनेचे तपशीलवार विश्लेषण केले. या घटनेतील आरोपींना शिक्षा झाली.

PM Modi Podcast With Lex Fridman: अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली मुलाखत रविवारी प्रसारीत झाली. तीन तासांच्या या पॉडकास्टमध्ये मोदी यांनी त्यांच्या जीवनातील अनेक अनुभव सांगितले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीबाबत सांगितले. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. या विषयावर त्यांनी प्रथमच जाहीरपणे भूमिका मांडली.
आधी या घटनाही समजून घ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी पॉडकास्टमध्ये म्हणाले, 2002 मधील गुजरात दंगलीचा विषयवर बोलताना त्यापूर्वी घडलेल्या काही घटनांचा उल्लेख करावे लागले. 24 डिसेंबर 1999 रोजी काठमांडूवरुन दिल्लीस जाणारे विमान हायजॅक केले गेले. 2000 मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ला झाला. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या ट्विन टावर्सवर दहशतवादी हल्ला झाला. ऑक्टोंबर 2001 मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेवर दहशतवादी हल्ला झाला. 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर हल्ला झाला. हे जागतिक स्तरावरील दहशतवादी हल्ले होते.
7 ऑक्टोबर 2001 रोजी मी गुजरातचा मुख्यमंत्री होणार होतो. 24 फेब्रुवारी 2002 ला मी पहिल्यांदा आमदार झालो. सरकार 27 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार होते. त्यावेळी गोध्रा रेल्वे दुर्घटनेची माहिती मिळाली. या रेल्वेत लोकांना जिवंत जाळण्यात आले. आधीच्या सगळ्या घटनांनंतर परिस्थिती कशी असेल याची तुम्ही कल्पना करू शकता, असे मोदींनी म्हटले.




2002 नंतर एकही दंगल नाही…
गोध्रा प्रकरणाबाबत एक खोटी कहाणी पसरवण्यात आली होती. 2002 पूर्वी गुजरातमध्ये 250 हून अधिक मोठ्या दंगली झाल्या होत्या. 1969 मध्ये सलग 6 महिने दंगल चालली. 2002 नंतर गुजरात राज्यात अशी एकही दंगल घडलेली नाही. कारण आमच्या सरकारने मतपेढीचे राजकारण केले नाही. “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या तत्त्वाचे पालन केले. गुजरात दंगलींनंतर लोकांनी माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी न्यायाचा विजय झाला. न्यायालयाने या प्रकरणात निर्दोष सोडले.
नरेंद्र मोदी म्हणाले, गुजरात दंगलीच्या वेळी केंद्रात विरोधी पक्षाचे सरकार होते. त्यांनी खोट्या खटल्यांमध्ये आम्हाला शिक्षा व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु न्यायव्यवस्थेने संपूर्ण घटनेचे तपशीलवार विश्लेषण केले. या घटनेतील आरोपींना शिक्षा झाली.